रत्नागिरी : त्या तरूणाचा गडनदीत मृतदेह सापडला, दोन दिवसांपूर्वी झाला होता बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:25 PM2018-06-13T17:25:18+5:302018-06-13T17:25:18+5:30
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी - मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला. रोहिदास राजाराम मोरे (वय ३३ वर्षे) असे त्याचे तरूणाचे नाव आहे.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी - मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला. रोहिदास राजाराम मोरे (वय ३३ वर्षे) असे त्याचे तरूणाचे नाव आहे.
रोहिदास हा १० रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने सर्वत्र शोधाशोध झाली. नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. तरीही रोहिदास न सापडल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती.
दोन दिवस ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास रोहिदासचा मृतदेह गावातीलच गडनदी पात्रात सापडला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.