रत्नागिरी : रामदास सावंत खुनाच्या तपासाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:55 PM2019-01-11T14:55:39+5:302019-01-11T14:57:28+5:30

चिपळूण नगर परिषदेचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास हा आव्हानात्मक आहे. आरोपी कितीही हुशार असला तरी त्याला आम्ही पकडणारच, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणेला मार्गदर्शन केले.

Ratnagiri: Challenge of Ramdas Sawant's murder investigation | रत्नागिरी : रामदास सावंत खुनाच्या तपासाचे आव्हान

रत्नागिरी : रामदास सावंत खुनाच्या तपासाचे आव्हान

Next
ठळक मुद्दे रामदास सावंत खुनाच्या तपासाचे आव्हानपोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी केली घटनास्थळाची पाहणी

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास हा आव्हानात्मक आहे. आरोपी कितीही हुशार असला तरी त्याला आम्ही पकडणारच, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणेला मार्गदर्शन केले.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी चिपळूण पोलीस ठाण्याला भेट दिली. येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या जागेवर रामदास सावंत यांचा खून झाला आणि मृतदेह आढळला त्या जागेची व परिसराची पाहणी केली व तपास यंत्रणेला मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस अधीक्षक मुंढे म्हणाले की, सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास हा आव्हानात्मक आहे. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यास काहीसा वेळ लागत आहे. मात्र, आम्ही सर्व बाजूने तपास करत आहोत. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल व आरोपी आमच्या ताब्यात येईल, असा विश्वास प्रविण मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

चार ते पाच पथके

पोलिसांची चार ते पाच पथके या प्रकरणाच्या तपासकामात गुंतली आहेत. वरिष्ठ अधिकारीही तपासात मार्गदर्शन करत आहेत. अनेकांच्या चौकशा व जाबजबाब घेण्यात आले आहेत. अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनीही बुधवारी भेट देऊन तपासकामाचा आढावा घेतला होता.

जाबजबाब नोंदवले

आता आठ दिवस उलटून गेले तरी या खून प्रकरणाचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गुंता अधिक वाढत असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. सावंत यांच्या जवळच्या व्यक्तींची पुन्हा पुन्हा चौकशी करण्यात आली, तर सावंत कुटुंबीयांचीही चौकशी करून जाबजबाब घेण्यात आले.

Web Title: Ratnagiri: Challenge of Ramdas Sawant's murder investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.