रत्नागिरी : ई-गव्हर्नर उपक्रमांतर्गत पोलीस दलातर्फे सिटीझन पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:08 PM2018-09-06T17:08:45+5:302018-09-06T17:11:53+5:30

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे केंद्र शासनाने ई - गव्हर्नर उपक्रमांतर्गत सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून आॅनलाईन विविध सुविधांचा वापर करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आदी विविध परवान्यांची मागणी तसेच ई - तक्रारींकरिता आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

Ratnagiri: Citizen Portal by Police Force under e-Governance program | रत्नागिरी : ई-गव्हर्नर उपक्रमांतर्गत पोलीस दलातर्फे सिटीझन पोर्टल

रत्नागिरी : ई-गव्हर्नर उपक्रमांतर्गत पोलीस दलातर्फे सिटीझन पोर्टल

Next
ठळक मुद्देई - गव्हर्नर उपक्रमांतर्गत पोलीस दलातर्फे सिटीझन पोर्टलई - तक्रारींकरिता आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे केंद्र शासनाने ई - गव्हर्नर उपक्रमांतर्गत सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून आॅनलाईन विविध सुविधांचा वापर करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आदी विविध परवान्यांची मागणी तसेच ई - तक्रारींकरिता आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे केंद्र शासनाने ई - गव्हर्नर उपक्रमांतर्गत नागरिकांकरिता सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून आॅनलाईन विविध सुविधांचा वापर करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आदी विविध परवान्यांच्या मागणीसाठी तसेच ई - तक्रारींकरिता आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

पोलीस ठाण्यात आपला अर्ज प्राप्त झाल्यानंतर आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी नोंदविण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येईल. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी या मंडळाला भेट देतील.

भेटीअंती संबधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परवाना देण्याबाबत ठरवतील. त्याबाबत संबंधित मंडळाचे पदाधिकारी यांच्या नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश आल्यानंतर संबंधित मंडळाचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात येऊन परवाना प्राप्त करून घ्यावा.

Web Title: Ratnagiri: Citizen Portal by Police Force under e-Governance program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.