शिंदे गटाकडून रत्नागिरी शहर शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर!
By अरुण आडिवरेकर | Published: September 27, 2022 11:25 PM2022-09-27T23:25:00+5:302022-09-27T23:25:31+5:30
रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उपनेते, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटाच्या रत्नागिरी शहर नवीन शिवसेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर अन्य पदेही जाहीर करण्यात आली आहेत.
रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्ष म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करीत कार्यरत असणारा पक्ष आहे. सर्व पदाधिकारी याचनुसार कार्यरत राहतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी ही कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे व पद पुढीलप्रमाणे :
शहरप्रमुख- बिपीन बंदरकर,
शहर संघटक- सौरभ मलुष्टे, नुरा पटेल,
उपशहर प्रमुख - विकास पाटील, विजय खेडेकर, किरण सावंत, भाऊ देसाई, मुसा काझी.
विभाग प्रमुख- गौतम बाष्टे, रुपेश पेडणेकर, इलियास कोपेकर, दीपक पवार, मनोज साळवी, संजय उर्फ बारक्या हळदणकर, अभिजित गोडबोले, संजय नाईक, नितीन लिमये, बाळू गांगण, इम्रान मुकादम, बाबू तळेकर, राहुल रसाळ, ताहीर मुल्ला.
शहर महिला संघटक, रत्नागिरी - स्मितल पावसकर
जिल्हा युवा अधिकारी रत्नागिरी (दक्षिण) - केतन शेट्ये
तालुका युवा अधिकारी रत्नागिरी - तुषार साळवी
युवा सेना रत्नागिरी शहर युवा अधिकारी - अभिजीत दुडे.