रत्नागिरी :कोयना येथे कंटेनर उलटला, १२ तासाने वाहतूक सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:01 PM2018-02-19T17:01:48+5:302018-02-19T17:03:05+5:30
शनिवारी रात्री १२.३० वाजता चेन्नईहून महाडकडे जाणारा कंटेनर कोयना कुसवडे या ठिकाणी उलटला. त्यामुळे कुंभार्ली घाट तब्बल १२ तास बंद होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कंटेनर बाजूला करुन घाट सुरळीत करण्यात आला. तब्बल १२ तासाने या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
शिरगाव : शनिवारी रात्री १२.३० वाजता चेन्नईहून महाडकडे जाणारा कंटेनर कोयना कुसवडे या ठिकाणी उलटला. त्यामुळे कुंभार्ली घाट तब्बल १२ तास बंद होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कंटेनर बाजूला करुन घाट सुरळीत करण्यात आला. तब्बल १२ तासाने या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
एका कंपनीच्या मोठ्या प्लेट्स घेऊन जाणारा कंटेनर (एमएच ४६ ६६७१) चेन्नईहून महाडकडे जात होता. यावेळी गाडी कुसवडे येथे रात्री १२.३० वाजता आली असता ब्रेक निकामी झाल्याने गाडी भररस्त्यात उलटली. त्यामुळे कुंभार्ली घाटातील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर नवजामार्गे वाहतूक सुरु करण्याचा पर्याय समोर आला.
मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी रात्री त्यामार्गे वाहतूक करण्यात आली नाही. मात्र, रात्रभर वाहतूक कोंडी झाल्यामुळे कोयनेच्या पोलीस निरीक्षक यांनी कोयना प्रकल्प अधिकाºयांशी बोलणी करुन रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत नवजामार्गे वाहतूक सुरु ठेवली होती.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटातील प्रवाशांची गैरसोय दूर केली व कोयनेचे पोलीस निरीक्षक चोकनडे यांनी कऱ्हाड येथून क्रेन आणल्यानंतर त्याच्या सहाय्याने कंटेनर दूर करुन कुंभार्ली घाटातील वाहतूक सुरळीत सुरु केली. यावेळी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक नीशा जाधव व चिपळूण टॅबचे पोलीस उपस्थित होते. १२ तासांनी वाहतूक सुरु झाली.