रत्नागिरी : स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लक्षवेधी, लोकमतचा सातत्याने पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:11 PM2018-11-30T17:11:29+5:302018-11-30T17:13:31+5:30

स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी गुरूवारी लक्षवेधीद्वारे आग्रही भूमिका घेतली. स्वतंत्र विद्यापीठाऐवजी उपकेंद्राच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा मुद्दा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मांडला.

Ratnagiri: Continuous follow-up on the focus of Lokmat for the separate Konkan University | रत्नागिरी : स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लक्षवेधी, लोकमतचा सातत्याने पाठपुरावा

रत्नागिरी : स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लक्षवेधी, लोकमतचा सातत्याने पाठपुरावा

Next
ठळक मुद्देस्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लक्षवेधीलोकमतचा सातत्याने पाठपुरावा

रत्नागिरी : स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीद्वारे आग्रही भूमिका घेतली. स्वतंत्र विद्यापीठाऐवजी उपकेंद्राच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा मुद्दा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मांडला.

आमदार डावखरेंसह अनेक सदस्यांनी स्वतंत्र विद्यापीठाचाच आग्रह धरल्यावर लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्यासाठी विधान परिषद सभापतींच्या दालनात बैठक घेण्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाच्या कारभारातील गोंधळामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या. सध्या कायदा अभ्यासक्रमाच्या ५५० जागा रिकाम्या आहेत. दोडामार्गपासून ५५० किलोमीटरवरून महाविद्यालयांना निकालासह छोट्या-छोट्या बाबींसाठी मुंबई विद्यापीठात येऊन पाठपुरावा करणे क्लेशदायक होते. या कामासाठी मुंबईत येऊन दोन दिवस राहिल्यानंतर पाठपुरावा करणे परवडत नाही.

या पार्श्वभूमीवर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कृती समिती स्थापन झाली. या समितीच्या माध्यमातून कोकणाच्या विकासासाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ सुरू करण्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे सरकार कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ देणार का, असा सवाल आमदार डावखरे यांनी केला.

कोकणातील १०८पैकी १०३ महाविद्यालयांनी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली असल्याचे डावखरे यांनी नमूद केले. जगात कोठेही गेले तरी मुंबई विद्यापीठाच्या पदवीला ह्यवेटेजह्ण आहे. सध्या विद्यापीठाबरोबर ८०१ महाविद्यालयांनी अ‍ॅफिलेशन केले असून, सात लाख विद्यार्थी आहेत. आॅनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना निकालासह अन्य बाबी उपलब्ध आहेत. आता प्रत्येक सुविधा सुरळीत झाली आहे.

त्यामुळे उपकेंद्रांचे सक्षमीकरण करुन सर्व विद्यार्थ्यांना सुविधा पुरविल्या जातील. याबाबत सरकारकडून निधी दिला जाईल, असे उत्तर राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. मात्र, या उत्तराला अनेक सदस्यांनी विरोध दर्शविला. कोकणची अस्मिता लक्षात घ्यावी, असे मत राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी व्यक्त केले. कोकणची गरज लक्षात घेऊन सरकारने अभ्यासक्रम सुरू करायला हवेत. त्यासाठी सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रामदास आंबटकर यांनी केले.

कोकणचा लॅण्डमार्क होईल. सर्व बाबी आॅनलाईन झाल्या तरी विद्यापीठात यावे लागते. त्यामुळे स्वतंत्र कोकण विद्यापीठ गरजेचे आहे, असे मत शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, विक्रम काळे यांनीही कोकण विद्यापीठाचा आग्रह धरला. नव्या विद्यापीठासाठी आर्थिक तरतूद होत नाही, याकडे शेकापचे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

१०० महाविद्यालये व ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थीसंख्या असेल, तर स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना होऊ शकते, असे राज्यमंत्री वायकर यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र कोकण विद्यापीठ मागणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाईल. विधान परिषद सभापतींच्या दालनात होणाऱ्या या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली जातील, असे वायकर यांनी सांगितले.

उपकेंद्रांचा फायदा नाही

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी, ठाणे आणि कल्याण उपकेंद्राचा विद्यार्थी व संस्थांना फायदा होत नाही. ठाणे उपकेंद्रात कर्मचाºयांची संख्या अपुरी असून, अन्य उपकेंद्रातही अशी स्थिती आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. या उपकेंद्रांचा विद्यार्थ्यांसाठी काय उपयोग, असाही सवाल केला. तर उपकेंद्रात मंजूर जागा व रिक्त जागा अशी माहिती देण्याची मागणी सदस्यांनी केली.

लोकमतच्या भूमिकेला पाठबळ

स्वतंत्र कोकण विद्यापीठ झाले पाहिजे, यासाठी विविध स्तरातून उठाव करण्यात येत आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लोकमतने सातत्याने आवाज उठविला आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ का आवश्यक आहे, त्याचा कोकणासाठी कसा फायदा आहे, यावर ह्यलोकमतह्णने सातत्याने प्रकाशझोत टाकला आहे. ह्यलोकमतह्णच्या भूमिकेला आता राजकीय व्यक्तींचेही पाठबळ मिळू लागले आहे.

Web Title: Ratnagiri: Continuous follow-up on the focus of Lokmat for the separate Konkan University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.