रत्नागिरीत कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ, नवे ३२२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:15+5:302021-07-27T04:33:15+5:30
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत ८ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ...
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत ८ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने २ हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यातच कोरोना चाचण्या वाढवताच रुग्णही वाढले असून, नव्याने ३२२ रुग्ण सापडले आहेत. काेराेनाबाधितांची एकूण संख्या ७०,२२१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत घट झाली असून, केवळ १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६५,४९३ रुग्ण बरे झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ७,९१५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात केवळ दोन रुग्ण आढळले आहेत तर दापोली, गुहागर, खेड, राजापूर या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. दापाेली तालुक्यात ५२, खेडमध्ये २६, गुहागरात ९३, चिपळुणात १८, संगमेश्वरात २६, रत्नागिरीत ६४, लांजात १५ आणि राजापुरात २६ रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुुळे खेड तालुक्यात २, चिपळुणात एक आणि रत्नागिरीत ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २,००४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्णांचा मृत्यूदर २.८५ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ९३.२७ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या २,७२४ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यामध्ये लक्षणे असलेले रुग्ण ७९९ तर लक्षणे नसलेले रुग्ण १,९२५ आहेत. ऑक्सिजनवर १८२ रुग्ण उपचार घेत आहेत.