रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३५ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:01 PM2020-06-27T16:01:44+5:302020-06-27T16:03:24+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवशी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये रत्नागिरीत १५, कामथे १०, कळंबोलीत ४, दापोलीत ४, राजापूर १ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात ५१९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे़
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवशी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये रत्नागिरीत १५, कामथे १०, कळंबोलीत ४, दापोलीत ४, राजापूर १ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात ५१९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे़
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग स्थानिकांनाही होऊ लागल्याने जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ रत्नागिरीतील दोन परिचारिका आणि आशासेविका, पोलीस यांच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे़ सध्या रुग्णालयात उपचाराखाली ९६ रुग्ण दाखल आहेत़ रत्नागिरी शहराजवळील कारवांचीवाडी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले़
जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये १, चर्मालय १, शिरगाव २, मारूती मंदिर १, खेडशी २, समर्थ नगर १, गावडे आंबेरे २, मालगुंड १, साठरेबांबर १, नवेल १, कुवेशी १, राजीवडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचबरोबर लांजात तालुक्यातील इसवली १, राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली १, चिपळूण तालुक्यातील चिपळूण शहर १, कापसाळ २, ओवळी १, दापोली तालुक्यातील आडे २, विसापूर २, हर्णै १, फुरूस ६, खेड तालुक्यातील भरणे २ आणि घरडा - लवेल येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या ४९ अॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत़ त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १९ गावांमध्ये, गुहागर, संगमेश्वर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गावात, दापोलीमध्ये ५ गावात, खेडमध्ये ८ गावात, लांजा, चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी ६ गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यातील २ गावांचा समावेश आहे़