रत्नागिरी जिल्ह्यालाही भारनियमनाची झळ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:42 PM2018-10-26T13:42:04+5:302018-10-26T13:43:06+5:30
रत्नागिरी : आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच राज्यात कोळसा तुटवडा भासत असल्याने औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती घटली ...
रत्नागिरी : आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच राज्यात कोळसा तुटवडा भासत असल्याने औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती घटली आहे. खुल्या बाजारातून वीज खरेदी करून वीजपुरवठा करण्यात येत असला तरी तूट भरून काढण्यासाठी जी-१ ते जी-३ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५३ फिडर असून जी-१ ते जी-३ मध्ये तीन फिडरचा समावेश आहे. त्यामुळे भारनियमनाची झळ बसू लागली आहे.
सध्या भारनियमन फिडरनिहाय सुरू करण्यात आले आहे. ज्या फिडरवर वीज गळती अधिक शिवाय व वीजबील वसुलीचे प्रमाण कमी अशा फिडरची वर्गवारी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १५३ फिडर असून ह्यएह्ण ते ह्यझेडह्ण गटात फिडर विभागण्यात आले आहेत. ह्यएह्ण गटात १७, ह्यबीह्ण गटात ३९, ह्यसीह्ण गटात २९, ह्यडीह्ण गटात २६, ह्यइह्ण गटात ८, ह्यएफह्ण गटात ४, जी-१ ते जी-३ मध्ये प्रत्येकी १ तर झेड गटात २७ फिडर आहेत. इ व एफ गटातील फिडर सध्या काठावर असल्याने या फिडरना भविष्यात भारनियमनाचा धोका आहे.
रत्नागिरी जिल्हा वीजबील वसुलीमध्ये अग्रक्रमांकावर होता. शिवाय वीज गळतीचे प्रमाणही अत्यल्प होते. मात्र सध्या थकबाकीचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यातील घरगुती तसेच इतर विविध एक लाख ७५ हजार ९३ ग्राहकांकडे १७ कोटी ३१ लाख १० हजाराची थकबाकी शिल्लक राहिल्याने महावितरणने वसुली मोहिम तीव्र केली आहे. जिल्ह्यातील ९६ हजार ८०१ घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी १७ लाख ७९ रूपये थकबाकी शिल्लक आहे. कृषीपंपाच्या ६ हजार २२३ ग्राहकांकडे ५७ लाख २८ हजार रूपये थकित आहेत. इतर ४ हजार ५६९ ग्राहकांकडे ४ कोटी ५६ लाख ३ हजाराची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीचे महावितरण पुढे आव्हान उभे ठाकले असून महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. तरीही वीजबील भरण्यासाठी नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठाच खंडित केला जात आहे.
ज्या फिडरवर अधिक थकबाकी, शिवाय वीज चोरी किंवा गळतीचे प्रमाण अधिक असणाºया फिडरची वर्गवारी करण्यात येत आहे. त्यानुसार त्या फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमन मुक्त, वसुलीमध्ये अव्वल व वीज गळती/चोरी नसलेला म्हणून रत्नागिरी जिल्हा अग्रक्रमावर असताना जिल्ह्यातही थकबाकी वाढली आहे. आकडा टाकून वीज चोरीचे प्रमाणही वाढले आहे. वीजबील भरण्याकरिता महावितरणने ग्राहकांना सुलभ व्हावे यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घरबसल्या ग्राहकांना वीजबिल भरणे शक्य झाले आहे. मात्र तरीही ग्राहकांकडून वीज बिल वेळेवर न भरण्याबाबतची अनास्था वाढली आहे. यामध्ये राजकीय लोकांचाही सहभाग अधिक आहे. सर्वात अधिक थकबाकी रत्नागिरी विभागात असून पाठोपाठ खेड विभाग आहे. तृतीय क्रमांकावर चिपळूण विभाग आहे.
विजेच्या मागणीत आता विक्रमी होत असून आतापर्यत तब्बल २४९६२ मेगावॉट सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली आहे. केंद्रिय कंपनीकडून ५१४७, औष्णिक प्रकल्प ५३६२, अदानी ३०८५, धारिवाल प्रकल्प १०५, गॅस २५१, कोयना ३८, पवनउर्जा ७०, सोलर ४८२, रतन इंडिया पॉवर २७४, जिंदाल समूह २८० मिळून एकूण १४ हजार ९८९ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. शिवाय खुल्या बाजारातून ३००० मेगावॅट वीज खरेदी करण्यात येत आहे. परंतु विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी अखेर जी-१ ते जी-३ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ए गटात असणारे फिडर १७ आहेत. ब गटात सर्वात अधिक फिडर आहेत. क व ड गटातही बºयापैकी संख्या आहे. इ व फ गटातील फिडर काठावर असून या फिडरना भारनियमनाचा धोका आहे. वसूलीचे प्रमाण घटले व वीज हानी वाढली तर मात्र भारनियमन अटळ आहे.