रत्नागिरी जिल्ह्यातील तिघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:07 PM2019-08-29T18:07:35+5:302019-08-29T18:08:57+5:30
यावर्षीचे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रथमच राज्य क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद शशिकांत मयेकर यांची निवड करण्यात आले आहे. तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.
रत्नागिरी : यावर्षीचे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रथमच राज्य क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद शशिकांत मयेकर यांची निवड करण्यात आले आहे. तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.
तर प्राथमिक शिक्षण गटात गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर येथील शिक्षक मनोज नरसी पाटील तर माध्यमिक गटात चिपळूण न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज खेर्डीचे सहाय्यक शिक्षक शिवाजी आबा पाटील यांची निवड करण्यात आले आहे .
राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागविण्यात येतात. त्यानंतर निवड समिती उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करते. यावर्षी क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद मयेकर यांची निवड झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
सन २००० मध्ये शिर्के स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झालेल्या विनोद मयेकर यांनी गेल्या वीस वर्षात तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय तर खो - खो खेळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार केले. खो-खोतील ऐश्वर्या सावंत या त्यांच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून भारताचे नाव उज्वल केले होते.
खो-खो क्रिकेट, कबड्डी, अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले. यामध्ये विनोद मयेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत केवळ मैदानावर ठाण मांडून विद्यार्थी घडवणाऱ्या विनोद मयेकर यांना राज्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.