रत्नागिरी जिल्ह्यात बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण
By admin | Published: April 1, 2017 06:32 PM2017-04-01T18:32:32+5:302017-04-01T18:32:32+5:30
राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना, २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागिल आर्थिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात २९५ बायोगॅस उभारण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील चुलींना पर्याय म्हणून बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना, यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. शिवाय कंपन्यांकडून गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचाच ठरत आहे. त्यासाठी शासनाने बायोगॅस प्रकल्क उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते.
राष्ट्रीय बायोगॅस विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़ एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफूटासाठी ९ हजार रुपये देण्यात योतत़ त्याला शौचालय जोडल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्या जनावर असणे अवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आतापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत.
शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली. एकीकडे मागेल त्याला बायोगॅस, तर दुसरीकडे या मागणीसाठी जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती. अखेर कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येवून बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २७० बायोगॅस आणि २०१६-१७ मध्ये २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने कृषी विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे़