रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 04:57 PM2020-09-19T16:57:16+5:302020-09-19T16:59:01+5:30

प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत १९८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के इतके झाले असून, या मृतांमध्ये ३५ वर्षाच्या तरुणाचाही समावेश आहे.

In Ratnagiri district, Corona claimed 198 lives and the death rate was 3.3 per cent | रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्केकोरोनाची दहशत, सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात

रत्नागिरी : प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत १९८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के इतके झाले असून, या मृतांमध्ये ३५ वर्षाच्या तरुणाचाही समावेश आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ५० वर्षावरील रुग्णांचा अधिक समावेश आहे. तर शुक्रवारी आलेल्या अहवालात एका ३५ वर्षाच्या तरूणाचाही मृत्यू झाला आहे. रत्नागिरीतील दुबईहून गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आलेली व्यक्ती जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठरली होती.

जिल्ह्यात कोरोनाबाधिताचा पहिला मृत्यू ६ एप्रिल रोजी कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात झाला होता. हा रुग्ण खेडमधील अलसुरे गावातील असून, तो दुबईहून आला होता़ प्रारंभी त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते़ मात्र, त्याची तब्येत अधिकच खालावल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़

जिल्ह्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच शिक्षकही कार्यरत होते़ जिल्ह्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच काही गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन फिव्हर रुग्णालय सुरु केले़ सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास अथवा मृत्यू झाल्यास संबंधित गाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसरामध्ये इतर गावातून येणाऱ्यांना बंदी घालण्यात आली होती़.

लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण गाव सील करण्यात येत होता़ त्याचबरोबर कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेहही त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही़ जिल्हा रुग्णालयात यावरुन वादही निर्माण झाले होते़ त्याचा त्रास आरोग्य यंत्रणेला झाला होता़

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस तसेच इतर रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे़ या महामारीच्या कालावधीत काम करताना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे़ कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे़

पोलिसाचा मृत्यू

रत्नागिरी पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर ज्योतिबा वसंत पाचेरकर कार्यरत होते़ काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती़ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला़

डॉक्टरची मृत्यूच्या दाढेत

कोरोना महामारीमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ़ दिलीप मोरे यांनी अनेक बालकांना कोरोनामुक्त केले़ त्यांनाही कोरोनाची लागण झाली़ त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला़

Web Title: In Ratnagiri district, Corona claimed 198 lives and the death rate was 3.3 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.