जनावरांना टँग लावण्यात रत्नागिरी जिल्हा अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:32 PM2017-10-06T16:32:46+5:302017-10-06T16:37:15+5:30
केंद्र शासनाने माणसाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड काढले. त्या धर्तीवर जनावरांची ओळख पटविण्यासाठी पशु संजीवनी, योजना सुरु करुन जनावरांची ओळख आणि पूर्व इतिहास ओळखण्यासाठी दुधाळ जनावरांसाठी १२ अंकी युनिक आयडी कोड देण्यात येत असून त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत टँग लावण्याच्या कामात सुरुवात झाली आहे.
चिपळूण, दि. ६ : केंद्र शासनाने माणसाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड काढले. त्या धर्तीवर जनावरांची ओळख पटविण्यासाठी पशु संजीवनी, योजना सुरु करुन जनावरांची ओळख आणि पूर्व इतिहास ओळखण्यासाठी दुधाळ जनावरांसाठी १२ अंकी युनिक आयडी कोड देण्यात येत असून त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत टँग लावण्याच्या कामात सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आतापर्यंत ११५० जनावरांना टॅग लावण्यात आलेले आहेत. रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. केंद्र शासनाने नागरिकांना आधार ओळखपत्र दिले आहेत.
त्यानुसार प्रत्येकाच्या वैयक्तिक माहितीचा आधारभूत डाटा तयार झालेला आहे. त्याच अनुषंगाने दुधाळ जनावरे, गाय, म्हैस वर्गातील गुरांनाही युनिक आय डी कोड दिला जात आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे ७३ पशुवैद्यकीय संस्थाप्रमुखाकडून गाय, म्हैशीना टॅग लावण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
टॅग लावलेल्या जनावरांची माहिती म्हणजेच जनावर कोणते, त्याचा रंग, त्याचे वय, शारिरीक स्थिती, दूध देण्याची क्षमता अशी माहिती टॅग लावल्यावर शासनाकडे आॅनलाईन पाठविली जात आहे.