रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ऊन -पावसाचाच खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:36 PM2017-08-24T15:36:47+5:302017-08-24T15:36:47+5:30
रत्नागिरी : जून - जुलै या ऐन पावसाच्या कालावधीत पाठ फिरवलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातही ऊन - पावसाचा खेळ खेळण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हवामान खात्याचे इशारे धुडकावणाºया वरूणराजामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये ३३६४ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता.
गतवर्षीच्या तुलनेने जून महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी याच कालावधीमध्ये सरासरीपेक्षा ९४ टक्के पाऊस झाला होता. तर यावर्षी केवळ ६८ टक्के पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यातही पाऊस फारसा समाधानकारक नव्हता. आॅगस्ट महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जिल्ह्यात पाऊस गायबच होता. जिल्हाभर हीच स्थिती आहे. त्यानंतर अधुनमधून पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्यावेळी जोरदार पाऊस पडत असला, तरी दिवसभर उन्हाचा कडाका असल्याने वातावरणात अजूनही गारवा आलेला नाही. त्यातच दिवसभर कडाक्याचे ऊन पडू लागल्याने उन्हाळ्याप्रमाणे उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.