CoronaVirus Positive News रत्नागिरी जिल्हा अजूनही ऑरेंज झोनमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 01:57 PM2020-05-06T13:57:29+5:302020-05-06T13:59:24+5:30

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या नागरिकांचे अहवाल हळूहळू मिळत असून, मंगळवारी रात्री एकाचवेळी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात दोन तर दापोली तालुक्यात दोघांचा समावेश होता.

Ratnagiri district is still in the Orange Zone | CoronaVirus Positive News रत्नागिरी जिल्हा अजूनही ऑरेंज झोनमध्येच

CoronaVirus Positive News रत्नागिरी जिल्हा अजूनही ऑरेंज झोनमध्येच

Next
ठळक मुद्देअद्याप रेड झोन जाहीर नसल्याची माहितीइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून घोषणा नाही नागरिकांमध्ये तर्कवितर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाबाधित ४ रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १५ झाल्याने जिल्हा रेडझोनमध्ये गेल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या अधिकृत संस्थेकडून याबाबत कोणत्याच गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शन प्राप्त झालेले नसल्याने जिल्हा अद्यापही ऑरेंज झोनमध्येच आहे.

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या नागरिकांचे अहवाल हळूहळू मिळत असून, मंगळवारी रात्री एकाचवेळी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात दोन तर दापोली तालुक्यात दोघांचा समावेश होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १५ आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून, ५ जण बरे झाले आहेत. तर नव्याने ९ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ९ झाली आहे. मात्र, रूग्णांचा एकूण आकडा १५ झाल्याने जिल्हा रेडझोनमध्ये गेल्याची चर्चा जोरात सुरू होती. पण, कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये जाणार याचा निर्णय इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था ठरवत असते.

ही संस्था जिल्ह्यात मिळणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्येचा आढावा घेते. त्यातही काही महत्वाचे निकष लावले जातात. त्यामध्ये जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या किती, ही संख्या कमी वेळेत दुप्पट होते का, कोरोना रूग्णामुळे स्थानिक भागात संक्रमण होते का? संबंधित भागामध्ये सामाजिक संक्रमण आहे का याचा अभ्यास सुद्धा झोन ठरवताना केला जातो. त्यामुळे एका दिवसात चार रूग्ण सापडले म्हणून तत्काळ झोन ठरवले जात नाही.

रत्नागिरीमध्ये सापडलेल्या १५ जणांना प्रवास इतिहास आहे. या रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोणत्याही भागामध्ये कोरोनाचे संक्रमण झालेले आढळून आलेले नाही. हे रूग्ण बाहेरून जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांना प्रशासनाने क्वॉरंटाईन केले आहे. त्यामुळे सध्यातरी हा जिल्हा ऑरेंज झोनमध्येच आहे.

Web Title: Ratnagiri district is still in the Orange Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.