रत्नागिरी : आमदारांकडून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, उदय सामंत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:23 PM2018-08-03T16:23:20+5:302018-08-03T16:29:39+5:30

तालुक्यातील बसणी -मांडवकरवाडी येथे नळकनेक्शन देण्यावरुन घाटी-कोकणी असा वाद निर्माण करणाऱ्या तसेच महिला सरपंचांना अपात्र व पोलिसी कारवाईची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाºयासह कर्मचाऱ्यांची आमदार उदय सामंत यांनी ग्रामस्थांसमोरच खरडपट्टी काढली़

Ratnagiri: Empowered by MLAs, employees' slogan, Uday Samant aggressor | रत्नागिरी : आमदारांकडून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, उदय सामंत आक्रमक

रत्नागिरी : आमदारांकडून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, उदय सामंत आक्रमक

Next
ठळक मुद्देआमदारांकडून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, उदय सामंत आक्रमक महिला सरपंचांना अयोग्य वागणूक

रत्नागिरी : तालुक्यातील बसणी -मांडवकरवाडी येथे नळकनेक्शन देण्यावरुन घाटी-कोकणी असा वाद निर्माण करणाऱ्या तसेच महिला सरपंचांना अपात्र व पोलिसी कारवाईची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची आमदार उदय सामंत यांनी ग्रामस्थांसमोरच खरडपट्टी काढली़

बसणी - मांडवकरवाडीमध्ये पाणीपुरवठा योजनेचे स्टॅण्डपोस्ट असतानाही कनेक्शन देण्यासाठी सरपंचांवर ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस़ एस़ आहेर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्याने दबाव टाकताना आताच्या आता नळकनेक्शन द्या अन्यथा पोलीस कारवाई आणि अपात्र ठरविण्याची धमकी सरपंचांना दिली होती़ याप्रकरणी बुधवारी आमदार सामंत, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह शिवसेना पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेला भेट दिली़ त्यावेळी सर्व सभापती, सदस्य उदय बने, बाबू म्हाप उपस्थित होते़

प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्या केबीनमध्ये बोलावून झाल्याप्रकाराबद्दल आमदार सामंत यांनी चांगलेच फैलावर घेतले़ यावेळी संबंधितांनी कानावर हात ठेवले़ यावेळी आमदार सामंत यांनी आपण धमकी देणारे कोण, पुढारीपण करायचे असेल तर नोकरी सोडा, त्याचबरोबर यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही सरपंचांना अशाप्रकारे वागणूक द्याल तर याद राखा, अशा शब्दात सुनावले़ त्याचबरोबर कोकणी-घाटी वाद निर्माण केल्याने जिल्हाप्रमुख चाळके, बने आणि म्हाप यांनीही कानउघडणी केली़ यावेळी सामंत यांचे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी स्वागत केले़

अधिकारी गप्प

आमदार सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली होती़ यावेळी उदय बने यांनी एवढा विषय असताना अध्यक्षांसमोर का ठेवला नाही, असाही प्रश्न उपस्थित केला़ यावेळी संबंधित अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाल्याचे दिसून आले.

Web Title: Ratnagiri: Empowered by MLAs, employees' slogan, Uday Samant aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.