रत्नागिरी : लांजातील खोरनिनकोत गॅसचा स्फोट; घर बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:52 PM2018-04-20T15:52:10+5:302018-04-20T15:52:10+5:30
गॅसवर दूध उकळायला ठेवून शेजारच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेल्या असता गॅसचा स्फोट होऊन घर आगीत बेचिराख झाल्याची घटना तालुक्यातील खोरनिनको सुतारवाडी येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली. घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. यामध्ये सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.
लांजा : गॅसवर दूध उकळायला ठेवून शेजारच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेल्या असता गॅसचा स्फोट होऊन घर आगीत बेचिराख झाल्याची घटना तालुक्यातील खोरनिनको सुतारवाडी येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली. घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. यामध्ये सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.
खोरनिनको - सुतारवाडी येथे चंद्र्कांत गंगाराम सावंत व त्यांचे बंधू किशोर गंगाराम सावंत यांच्या सामूहिक मालकीचे घर आहे. या घरात त्यांची आई सुनंदा गंगाराम सावंत (७०) या एकट्याच वास्तव्यास आहेत. १८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांनी गॅसवर दूध उकळायला ठेवून टीव्ही पाहावा म्हणून नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या शेजारी गेल्या होत्या.
काही वेळ त्या तेथेच टी. व्ही. पाहात बसल्या होत्या. थोड्या वेळाने घराकडून मोठा आवाज आला. तो आवाज ऐकून त्यांच्यासह आजुबाजूचे लोक पाहण्यासाठी गेले असता, घरात स्फोट होऊन घराला आग लागल्याचे निदर्शनास आले. स्फोट इतका भयंकर होता की, घराचे छप्पर उडाले. एक दरवाजा तुटला, भिंतीनाही तडे गेले.