रत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:49 PM2019-06-20T13:49:47+5:302019-06-20T13:50:43+5:30
एमआयडीसी मिरजोळे येथील अॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळे येथील अॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
कंपनीचे मालक सिराज काझी यांनी २००६मध्ये सिटी कंपोस्टचा परवाना काढला होता. २००९ साली हा परवाना रद्द झाल्यानंतर तो पुन्हा काढण्यात आलेला नाही. याशिवाय कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या यंत्रसामुग्रीशिवाय प्रयोगशाळा उपलब्ध नसताना ५ हजार ७७१ सेंद्रीय खताची पोती सापडली आहेत.
राजापूर तालुक्यातील कशेळी येथे मंगळवारी तालुका पथकाने घातलेल्या धाडीमध्ये ३४२ बोगस सेंद्रीय खताची पोती जप्त केली होती. या खत विक्रेत्यांकडेदेखील कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे उघडकीस आले.
या नियंत्रण पथकामध्ये मिरजोळेच्या पोलीसपाटील समीक्षा पाडावे, सरपंच गणेश पाडावे, माजी सरपंच गजानन गुरव, ग्रामसेवक कृष्णकांत सावंत, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक जी. आर. मुरकुटे, जिल्हा कृषी अधिकारी आरीफ शहा, पंचायत समिती कृ षी अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषी पर्यवेक्षक काशिनाथ बापट, कृ षी सहाय्यक व्ही. बी. नाडे यांचा समावेश होता.
२००६ साली सिटी कंपोस्टचा परवाना काझी यांनी काढला होता. २००९ साली हा परवाना संपला असून, त्यानंतर कोणताही परवाना नसताना खत निर्मिती करुन विक्री सुरु होती. आतापर्यंत बोगस सेंद्रीय खतामध्ये सर्वांत मोठा साठा सापडला आहे. राजापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या बोगस खतविक्रीमुळे कंपनीतील बोगस साठ्याकडे पोहोचणे शक्य झाले. शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
- आरीफ शहा,
कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.