सेंद्रिय जिल्ह्यासाठी रत्नागिरी शेतकऱ्यांचेच प्रयत्न- रासायनिक खतांच्या शेतमालाला नापसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:47 PM2018-09-29T16:47:33+5:302018-09-29T16:50:06+5:30
पिक उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा केला जाणारा अति वापर यामुळे उत्पादकतेबरोबर, दर्जावरही परिणाम होवू लागला आहे. परिणामी परदेशी तसेच मोठ्या बाजारपेठेत रासायनिक खते वापरलेल्या
रत्नागिरी : पिक उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा केला जाणारा अति वापर यामुळे उत्पादकतेबरोबर, दर्जावरही परिणाम होवू लागला आहे. परिणामी परदेशी तसेच मोठ्या बाजारपेठेत रासायनिक खते वापरलेल्या शेतीमालाला नापसंती दर्शविली जात असल्याने शेतकरी बांधवच आता जागृत झाला आहे. शेती बरोबर उत्पादकता वाढीसाठी शेतकºयांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटले आहे. रत्नागिरी जिल्हा सेंद्रिय व्हावा यासाठी शेतकºयांचे प्रयत्न तर सुरू झाले आहेत. शिवाय शासकीय स्तरावरूनही जिल्ह्यात जैविक ग्रामयोजना जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
पिकांच्या उत्पादकतेसाठी किंवा वाढीसाठी बारा प्रकारची अन्नद्रव्ये गरजेची आहेत. सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फूरद, पालाश, नायट्रोजन, तांबे, बोरॉन आदि घटकांचा समावेश आहे. पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी प्रामुख्याने सुक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण पाच पर मिलीयम इतके असणे आवश्यक आहे. परंतु हेच प्रमाण कमी असल्याने मूळांची वाढ होत नाही. त्यामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. जस्ताचे प्रमाण कमी असल्याने पिकाला पक्वता येत नाही शिवाय उत्पादनात घट होते. जस्त, स्फूरद, नत्र, गंधकाचे प्रमाण कमी असल्याने या घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी गांडूळ खत, शेणखताचा वापर अधिक करणे गरजेचे आहे.
पिकाच्या वाढीसाठी स्फूरदयुक्त खतांचा वापर करावा, अशा सूचना शेतकºयांना करण्यात येत आहेत. वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे पिक व निव्वळ रासायनिक खतांचा वापर शेतकºयांकडून केला जात असल्यामुळेच जमिनीतील सूक्ष्ममूलद्रव्य्याचे प्रमाणात घट होत चालली आहे.
थंडीमुळे फुलोºयाची प्रक्रिया सुरू होते. बुरशीजन्य व अन्य रोगांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतो. मात्र रासायनिक औषधांमुळे तुडतुडा, फुलकीडे, हॉपर्सचे प्रमाण कमी न होता, परागीकरण करणाºया माशांचे जीवन संपूष्टात आल्यामुळे परागीकरणावर त्याचा परिणाम होत आहे. मोहोर आला असला तरी प्रत्यक्षात परागीकरणाअभावी फळधारणा मात्र होत नाही.
या परिणामांपासून धडा घेतलेले शेतकरी हळूहळू आता एकवटू लागले आहेत. सेंद्रिय पध्दतीचे महत्व अवगत झालेल्या शेतकºयांनी एकत्र येवून शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. हजार शेतकºयांनी एकत्रित येवून ह्यरत्नागिरी आॅर्गेनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीह्णची स्थापना केली आहे. सुरूवातीलाच बहुसंख्येने एकत्रित येवून सुरू केलेली राज्यातील पहिली सेंद्रिय कंपनी आहे. सेंद्रिय पध्दतीने शेती करणारे २८ गट व त्यातील एक हजार शेतकºयांचा समावेश या कंपनीच्या भागधारकामध्ये आहे. १४०० एकर क्षेत्राचे सेंद्रिय प्रमाणीकरण करून झाले असून लवकरच ७०० एकर क्षेत्राचे प्रमाणीकरण होण्याच्या मार्गावर आहे. सेंद्रिय क्षेत्रातील उत्पादित मालाचीच विक्री या कंपनीव्दारे करण्यात येणार आहे. यापुढे या कंपनीव्दारे थेट विक्री करण्याचा उद्देश्य आहे.
रासायनिक कीटकनाशकांवर बंदी आणण्यात आली असली तरी अद्याप त्या कीटकनाशकांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. कीटकनाशकांचे दर महागडे असल्याने आंबा उत्पादनाच्या खर्चात भरमसाठ वाढत होते. यावर पर्याय म्हणून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. जीवामृत, गांडूळ खत किंवा अन्य सेंद्रिय खते विविध पिकांसाठी शेतकरी वापरत आहेत. कोकण ग्रीन बेल्ट झोन तयार करण्यापूर्वी प्राथमिक स्तरावर जिल्हा सेंद्रिय करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ह्यजैविक ग्रामयोजनाह्ण राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. यासाठी ग्रामसभेत गावात शंभर टक्के सेंद्रिय शेती करण्याचा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. शिवाय अंमलबजावणी देखील काटेकोर होणे गरजेचे आहे. सेंद्रिय गावासाठी शासनाकडून एक लाखाचे पारिताषिकही दिले जाणार आहे.
कोट घ्यावा
शासनाकडूनही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. केंद्र शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्रात सेंद्रिय शेती प्रशिक्षण देणारी पाच प्रशिक्षण केंद्रे असून पैकी एक रत्नागिरीत आहे. शेतकºयांना पूर्णत: सेंद्रिय शेती कशी करावी याचे मार्गदर्शन तर करण्यात येतेच शिवाय शेतकºयांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री देखील कशी व कुठे करावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकरी कंपनीतर्फे स्थापन करण्यात येणाºया मिनी मॉलमुळे आता विक्रीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
- संदीप कांबळे, प्रशिक्षण समन्वयक, सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी.