रत्नागिरी : उपशिक्षक पावरा यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 06:56 PM2018-10-25T18:56:33+5:302018-10-25T18:57:47+5:30
खेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच उर्वरित दोन मूळ कागदपत्रासह २ लाख रुपयांच्या दंडाची रक्कम द्या अशा एकूण २३ मागण्यांसाठी उपशिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
रत्नागिरी : खेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच उर्वरित दोन मूळ कागदपत्रासह २ लाख रुपयांच्या दंडाची रक्कम द्या अशा एकूण २३ मागण्यांसाठी उपशिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
पावरा यांनी यापूर्वीही विविध मागण्यांसाठी अनेकदा जिल्हा परिषदेसमोर उपोषणाद्वारे आंदोलन केले होते. त्यांचा तीन महिन्यांचा पगार, निर्वाह भत्ता तात्काळ देण्यात यावा, मॅट मुंबई यांच्या दि. ११ सप्टेंबर, २०१८ रोजीच्या निर्णयानुसार निलंबन रद्द करण्यात यावे, २ मूळ कागदपत्र, डी.एड. गुणपत्रक व प्रमाणपत्र त्वरित मिळावीत, कागदपत्रे लपवून ठेवणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबीत करावे, खेडचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्याबद्दलच्या अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारींचा ठपका ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
माहिती अधिकार अर्ज कोर्ट तिकीटासह फाडणाऱ्या दोषारोपीत अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे. दापोलीचे शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल कचरु शिंदे यांना बोगस डिग्री चौकशी अहवालाच्या आधारे तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे. तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या विविध दोषांरोपांचाही विचार करण्यात यावा व अन्य मागण्यांसाठी उपशिक्षक पावरा यांनी जिल्हा परिषदेसमोर आज दिवसभर लाक्षणिक उपोषण केले.