Ratnagiri: आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 12:07 PM2023-07-09T12:07:49+5:302023-07-09T12:09:05+5:30

Ratnagiri:  रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

Ratnagiri: First father, then mother and children, four missing from same family, stir in Dapoli | Ratnagiri: आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ

Ratnagiri: आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ

googlenewsNext

- शिवाजी गोरे

रत्नागिरीरत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांनी एक नियुक्त केले असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

2 जुलै रोजी दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास बेपत्ता झाला.दुसऱ्याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेवून जाते सांगून घरातून निघून गेली तीसुध्दा अद्याप परतलीच नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भरत याला घरातून निघून जाण्याची सवय आहे तो यापूर्वी पण असाच बेपत्ता झाला होता पण यावेळी पत्नी व दोन लहान मुले ही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत असून शोशोध सुरू आहे.

या सगळ्या खळबळजनक प्रकाराचा छडा लावण्यासाठी पोलीसांसमोर हे मोठा आव्हान आहे. उपनिरीक्षक दर्जाचे नेतृत्वाखाली नेमण्यात आलेले पथक या कुटुंबाच्या शोधार्थ रवाना झाले आहे लवकरच काही माहिती हाती मिळेल असा विश्वास पोलिसांना आहे. मात्र या प्रकरणी अद्यापतरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची तर नाही ना ? याचाही तपास पोलिसांनी युध्दपातळीवर सुरू केला आहे. 

दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालूक्यातील कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्टी आणणे करीता जात आहे असे सांगून घरातून निघून गेला. तो अदयापपर्यंत घरी आलेलाच नाही. दुकानात जातो असे सांगून निघून गेलेल्या भरत भेलेकरचा कुटूंबासह नातेवाई मित्र मंडळीनी सर्वत्र शोध घेवून देखील तो कुठेच न सापल्यामुळे अखेर दापोली पोलीस ठाण्यात  भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. भरत भेलकर नापत्ता झाल्याच्या नेमके दुस-याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची  पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी घेवून घरातून निघून गेली तीसुध्दा परत सायंकाळपर्यंत आपल्या घरी पुन्हा  परतलीच नाही.

आराध्य व श्री या चिमुकल्यांचा तसेच  सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कोठेही  ठावठिकाणा लागलाच नाही. दूरध्वनीवरही संपर्क  केला गेला मात्र  संपर्कच होत  नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.असुन अज्ञात संशयीतांवर भा.द.वि.क. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळया प्रकरणी घटनेतील प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहा्ययक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे  करत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक श्री. अहिरे यांनी यासाठी खास एका पथकाची नियुक्ती केली आहे

Web Title: Ratnagiri: First father, then mother and children, four missing from same family, stir in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.