रत्नागिरी : घरफोड्या करणारे ४ चोरटे गजाआड, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 05:10 PM2018-07-14T17:10:19+5:302018-07-14T17:11:42+5:30

चिपळूणमध्ये ५ जुलै २०१८ रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पेण येथून होंडा सिटीने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ४ चोरट्यांना गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून होंडा सिटी गाडीसह सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८ लाख १८ हजार ३७० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

Ratnagiri: Four gang-raped burglars, local crime investigation | रत्नागिरी : घरफोड्या करणारे ४ चोरटे गजाआड, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कामगिरी

रत्नागिरी : घरफोड्या करणारे ४ चोरटे गजाआड, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कामगिरी

googlenewsNext
ठळक मुद्देघरफोड्या करणारे ४ चोरटे गजाआडस्थानिक गुन्हा अन्वेषणची कामगिरी८ लाख १८ हजार ३७० रुपयांचा ऐवज हस्तगत

रत्नागिरी : चिपळूणमध्ये ५ जुलै २०१८ रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पेण येथून होंडा सिटीने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ४ चोरट्यांना गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून होंडा सिटी गाडीसह सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८ लाख १८ हजार ३७० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

संशयित आरोपींमध्ये ज्ञानेश्वर अप्पादुराई शेट्टी (३५, रा. गणराज पॅलेस, रुम नं. ४०१, दिवा, जि. ठाणे, मूळ रा. तामिळनाडू), नासिर खान इसाक खान पठाण (३९, रा. नाझिया मंजील, नरिमलनगर, जालना), मुकेश भागोजी बाळसराफ (३४, रा. आंबिवली, नवनाथ कॉलनी, माणी, ता. कल्याण. मूळ रा. जुन्नर, पुणे), रवी रामचंद्र शेट्टीयार (३४, रा. वागळे इस्टेट रोड, शिवशक्तीनगर, जि. ठाणे, मूळ रा. तामिळनाडू) यांचा समावेश आहे.

चिपळूण व खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये वाढलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची २ पोलीस पथके तयार करून त्यांच्याकडे घरफोड्यांचा तपास सोपवला होता.

पोलिसांचे पथक मुंबई येथे जात असताना पेण (जि. रायगड) या ठिकाणी हॉटेल हीमगौरीनजीकच्या मोकळ्या जागेमध्ये एक काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी (एमएच ०१-एएच - ५८६४) उभी असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. वाहनाची झडती घेतली. त्यावेळी चालकाच्या सीटच्या खाली स्क्रूड्रायव्हर, अ‍ॅडजस्टेबल पाना, कटावणी इत्यादी हत्यारे दिसून आली. तसेच गाडीमधील एका स्टीलच्या डब्यात सोन्याचे दागिने सापडले आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कांबळे, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, विजय आंबेकर, रमीज शेख, चालक दत्ता कांबळे यांनी सहभाग घेतला होता.

स्थानिकांनी पाहिलेल्या गाडीवरून माग

चिपळूणमधील हा गुन्हा करताना आरोपींनी एमएच ०१ पासून सुरू होणाऱ्या नंबरची काळ्या रंगाची होंडा सिटी स्थानिकांनी पाहिली होती. त्यावरुन गुन्हेगार हे मुंबई किंवा ठाणे परिसरातील असावेत, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक रायगड, ठाणे, मुंबई या परिसरात पाठविण्यात आले होते. पोलिसांचा हाच अंदाज खरा ठरला.
 

Web Title: Ratnagiri: Four gang-raped burglars, local crime investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.