रत्नागिरी : दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 03:25 PM2018-11-03T15:25:40+5:302018-11-03T15:28:44+5:30
आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़.
रत्नागिरी : आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़.
महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ कोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने रत्नागिरीत आल्या होत्या़ त्या पुढे म्हणाला, राज्य सरकारने गेली चार वर्षे केवळ आश्वासने दिली़ त्या आश्वासनाचे कुठेही फलीत झालेले आपल्याला पहायला मिळत नाही़ चार वर्षे पूर्ण झाल्याने सरकारकडून राज्यात महागाई वाढली, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यांचे सेलीबे्रशन सुरु आहे. देशात आणि राज्यात फार भीषण परिस्थिती असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.
गोरगरिबांच्या तोंडचा गोड घास या सणासुदीच्या दिवसांत पळवून नेण्याचं पाप या सरकारने केलंय़ हेच अच्छे दिन आहेत का, असे विचारण्याची आज वेळ आली आहे़ रेशन दुकांनावर गहू, तांदूळ, साखर नाही़ ज्या ठिकाणी गहू, तांदूळ आहे तेथे तूरीची डाळ जबरदस्तीने गरीबांच्या माथी मारली जात आहे, अशी परिस्थिती आहे़.
या सरकारचं ५० टक्के जनसंख्येवर विश्वास राहिलेला नाही़ कारण आता बायोमेट्रिक पध्दत आणली़ या आधी धान्य सर्वांना मिळायचं़ आता मात्र थमइंप्रेशनशिवाय धान्य मिळत नाही़ बरेच लोक वयोवृध्द आहेत़ ते रेशन दुकानांपर्यंत येवू शकत नाहीत़ अशानाही तेथेपर्यंत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.
विकृतीला शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत़ असे अनेक प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत़ कशा पध्दतीने हे सरकार फसवे आहे़ हे लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे़ तसेच जनतेमध्ये या सरकारकडून फसवणुक झाल्याची भावना निर्माण झाल्याचे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे़ आश्वासने पूर्ण करु शकलेले नाही़ म्हणूनच येणाऱ्या दिवसांमध्ये परिवर्तन निश्चित दिसेल़ आणि या सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे काम ही महाराष्ट्राची जनता करील, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला़,
यावेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, अल्पसंख्यांक नेते बशीर मुर्तुझा, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, नगरसेवक मुसा काझी आणि इतर कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़