रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्याच वर्षी राज्यात प्रथम

By शोभना कांबळे | Published: September 25, 2024 06:16 PM2024-09-25T18:16:35+5:302024-09-25T18:26:36+5:30

रत्नागिरी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ...

Ratnagiri Government Medical College first in the state in the very first year | रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्याच वर्षी राज्यात प्रथम

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्याच वर्षी राज्यात प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. येथील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाने पहिल्याच वर्षी ९९ टक्के गुण मिळवून राज्यातील सर्व वैद्यकीयमहाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने प्रथम वर्ष एम. बी. बी. एस. परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. २४ सप्टेंबर रोजी जाहीर केला. यामध्ये राज्यातील पहिल्या ५ वैद्यकीय महाविद्यालयांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी ९९ टक्के, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे ९६ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, ९५.३० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर ९५.३० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर ९५.२० टक्के, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ९५.१८ टक्के.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या पहिल्या तुकडीतील शरीररचना शास्त्रात १, शरीरक्रियाशास्त्रमध्ये २ आणि जीवरसायनशास्त्रामध्ये १५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. एमबीबीएसच्या पहिल्याच तुकडीने मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी व अध्यापकांचे विशेष कौतुक केले. यशाची ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी, अशा शब्दात पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Ratnagiri Government Medical College first in the state in the very first year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.