राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:50 PM2018-11-22T12:50:08+5:302018-11-22T12:50:47+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ ...

Ratnagiri impression across the state: Planting on 3,666 hectares from nine Panchayat Samitis | राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देफळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषद अव्वल

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरीजिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या फळबाग लागवडीपैकी जिल्हा परिषदेने ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली असून, उर्वरित क्षेत्रावर कृषी विभागातर्फे लागवड करण्यात आली आहे. एवढ्या क्षेत्रावर लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत दहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र, ऐनवेळी रोपे कमी पडल्याने केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी गतवर्षीचे उरलेले ४,७८८ हजार आणि यावर्षी नव्याने ७,७१०  मिळून एकूण १२,४९५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून खासगी रोपवाटिकांतून १६ लाख आणि शासकीय रोपवाटिकांतून व कृषी विद्यापीठातून ८ लाख अशा  २४ लाख रोपांची उपलब्धताही करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी विभागाला एकूण ४,५०७ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले तर पंचायत समित्यांना ४,३८१ हेक्टर इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.  फळबाग लागवडीचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. आत्तापर्यंत ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कृषी विभागाकडून अधिक लागवडीची अपेक्षा असतानाच जिल्हा परिषदेच्या नऊही पंचायत समित्यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले आहे. जिल्हा कृषी विभागाने  २,३५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे तर नऊ पंचायत समित्यांकडून ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यात रत्नागिरी, संगमेश्वर आणि खेड या तीन पंचायत समित्या अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर दापोली, चिपळूण आणि लांजा कृषी विभाग हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड करणारा रत्नागिरी जिल्हा एकमेव आहे. या लागवडीसाठी पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांनी विशेष प्रयत्न केल्याने यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

 

यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मेहनत घेतल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक फळबाग लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

- डॉ. जयकृष्ण फड, प्रभारी उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभाग, रत्नागिरी.

Web Title: Ratnagiri impression across the state: Planting on 3,666 hectares from nine Panchayat Samitis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.