रत्नागिरी : कोसुंब ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:56 PM2018-03-29T17:56:49+5:302018-03-29T17:56:49+5:30
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण जाधव यांनी केले.
देवरूख : कोसुंब ग्रामपंचायतीने महिलांसाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी छोटे-छोटे उद्योग केले पाहिजेत. यासाठी महिलांना पंचायत समितीकडून लागेल ते सहकार्य केले जाईल. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती सारिका जाधव यांनी कोसुंब येथील कार्यक्रमात दिली.
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण जाधव यांनी केले.
यावेळी नूतन सभागृहाचे उद्घाटन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला कोसुंबचे सरपंच किरण जाधव, माजी सरपंच अशोक धामणे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश जाधव, सेनेचे शाखाप्रमुख महेंद्र शिंदे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष श्रीयाळ जाधव, ग्रामपंचायत सदस्या जाधव आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांचे हिमोग्लोबिन तपासणी व सर्वसाधारण मातांचे जनरल तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांना औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले तर चिपळूणच्या सुनिता गांधी व आरोग्य सहाय्यिका एस. पी. नाईक यांनी मुलींनी किशोरवयात घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.