रत्नागिरी : मागेल त्याला वीज देण्यासाठी वीज डेपो स्थापित करणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 12:20 PM2018-01-27T12:20:25+5:302018-01-27T12:25:26+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात मागेल त्याला वीज देण्यासाठी विविध ठिकाणी वीज डेपो स्थापित करण्यात येणार आहेत. येत्या काळात सर्वांना वीज देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तसेच शेतीसाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

Ratnagiri: The information will be provided by the Guardian Minister, Ravindra Waikar, to set up a power depot to give him electricity | रत्नागिरी : मागेल त्याला वीज देण्यासाठी वीज डेपो स्थापित करणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

रत्नागिरी : मागेल त्याला वीज देण्यासाठी वीज डेपो स्थापित करणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

Next
ठळक मुद्देमागेल त्याला वीज देण्यासाठी वीज डेपो स्थापित करणाररत्नागिरी पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागेल त्याला वीज देण्यासाठी विविध ठिकाणी वीज डेपो स्थापित करण्यात येणार आहेत. येत्या काळात सर्वांना वीज देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तसेच शेतीसाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप पी., अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनाराण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयकृष्ण फड, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे, स्वांतत्र सैनिक, माजी सैनिक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञानी केलेल कृषिविषयक संशोधन शेतकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम शासन करत आहे. येत्या काळात संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक, सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तसेच विविध शासकीय विभागांनी चित्ररथाच्या माध्यमातून शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी चित्ररथाचे आयोजन केले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Ratnagiri: The information will be provided by the Guardian Minister, Ravindra Waikar, to set up a power depot to give him electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.