Ratnagiri: शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 09:29 AM2023-09-21T09:29:13+5:302023-09-21T09:30:02+5:30

Ratnagiri News:

Ratnagiri: Jack well at Sil Dam collapsed | Ratnagiri: शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली

Ratnagiri: शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली

googlenewsNext

- मेहरून नाकाडे
रत्नागिरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ  धरणातील जॅक वेल कोसळली आहे. मात्र आता नवीन जॅक वेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.  यावर उपाय म्हणून पानवलं धरणातून व एम आय डी  सी कडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे.  

गुरूवारी पहाटे जॅक वेल कोसळतच माजी नगरसेवक निमेश नायर आणि नगर परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिळ धरणाकडे धाव घेतली. सध्या नवीन  जॅक वेल बांधून पूर्ण झाली आहे. ही नवीन जॅक वेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी कडून पाणी पुरवठा
गुरूवारी पहाटे शिळ धरणातील जॅकवेल कोसळल्याची माहिती माजी नगरसेवक निमेश नायर यांनी देताच सर्वत्र चिंता व्यक्त होऊ लागली. सुरु असलेला गणेशोत्सव लक्षात घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पहाटे पाच वाजता एमआयडीसी सीईओ बिपीन शर्मा यांना सूचना दिल्या व रत्नागिरी शहराला रोज दहा एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे गुरुवारी दुपारनंतर रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri: Jack well at Sil Dam collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.