रत्नागिरी : बेशिस्त पार्किंगला जॅमर, वाहतूक शाखेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:01 PM2018-06-29T16:01:07+5:302018-06-29T16:03:40+5:30
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन इमारतींसह, प्रांत कार्यालय तसेच अन्य कार्यालयेही आहेत. या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून दुचाकी तसेच चारचाकी वाहने वाट्टेल तशी लावली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात शासकीय वाहने तसेच खासगी वाहने यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी तसेच नागरिकांच्या खासगी वाहनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर ह्यनो पार्किंगह्णचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही नागरिक त्याच्यासमोरच आपली वाहने दामटवून लावत होते. त्यामुळे प्रशासनाला ही डोकदुखी ठरत होती.
अखेर या बेशिस्त वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी शहर वाहतूक शाखेला या बेशिस्त पार्किंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या शाखेचा पदभार नुकताच स्वीकारलेले पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून या परिसरात कडक कारवाईला प्रारंभ झाला आहे.
नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात येत असून, २०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. याठिकाणी कडक कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणाऱ्या वाहनांच्या गर्दीला शिस्त लागणार आहे.
या परिसरातील वाहनव्यवस्था सुरळीत होईपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. शहरात बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांनी ह्यनो पार्किंगह्णमध्ये वाहने उभी न करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केल्या आहेत.