राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी कल्याण परिमंडळाचे यश
By मेहरून नाकाडे | Published: February 5, 2024 05:39 PM2024-02-05T17:39:48+5:302024-02-05T17:40:12+5:30
रत्नागिरी : महावितरणच्या आंतर परिमंडळीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत रत्नागिरी कल्याण ...
रत्नागिरी : महावितरणच्या आंतर परिमंडळीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत रत्नागिरी कल्याण परिमंडळाच्या संयुक्त संघाने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ३ सुवर्ण व ७ रौप्यपदके पटकावित चमकदार कामगिरी केली. कबड्डीत विजेतेपदाचा बहुमान मिळविला.
सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी (पुरूष) हा संघ विजेता तर क्रिकेट (पुरुष) हा संघ उपविजेता ठरला. टेबल टेनिस सांघिक (महिला) रंजना तिवारी, प्राची ठाकरे व अश्विनी साळवे यांनी रौप्यपदक पटकावले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडीत अमित हुमणे, बुध्दिबळात रंजना तिवारी यांनी सुवर्णपदके पटकावली. १०० व २०० मीटर धावणे मेघा जुनघरे, भालाफेकीत हर्षला मोरे, टेबल टेनिस एकेरी रंजना तिवारी, टेबल टेनिस दुहेरी अविनाश पवार व अशोक बामगुडे यांनी रौप्यपदके पटकावली.
विजेत्या संघाचे व खेळाडूंचे मुख्य अभियंता परेश भागवत, अधिक्षक अभियंता स्वप्नील काटकर (रत्नागिरी), अधिक्षक अभियंता विनोद पाटील (सिंधदूर्ग), अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) कल्पना पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आहे.