आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरीचे ‘किनारा’ प्रथम

By अरुण आडिवरेकर | Published: January 6, 2024 05:01 PM2024-01-06T17:01:00+5:302024-01-06T17:02:32+5:30

नांदेड येथे एसटी महामंडळाची स्पर्धा, सिंधुदुर्गचे ‘जिथे राबती हात’ द्वितीय

Ratnagiri Kinara stands first in inter departmental drama competition | आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरीचे ‘किनारा’ प्रथम

आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरीचे ‘किनारा’ प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरी विभागाच्या ‘किनारा’ नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्याचबरोबर दिग्दर्शन, नेपथ्य व रंगमंच व्यवस्था, स्त्री अभिनयाचे प्रथम आणि विशेष अभिनयाचे प्रमाणपत्रही पटकावले. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या ‘जिथे राबती हात’ नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला.

ही स्पर्धा नांदेड येथील कुसुम नाट्यगृह येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत आयाेजित करण्यात आली हाेती. स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सादर केलेल्या जयवंत दळवी लिखित ‘किनारा’ नाटकाने बाजी मारली. या नाटकाची निर्मिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बाेरसे यांनी केली हाेती. त्यासाठी यंत्र अभियंता (चलन) अनंत कुलकर्णी, उपयंत्र अभियंता मृदूला जाधव यांनी सहाय केले.

या नाटकात श्रद्धा मयेकर, नंदकुमार भारती, प्रदीप घवाळी, सुप्रिती शिवलकर, भाग्यश्री अभ्यंकर आणि प्रशांत आडिवरेकर यांनी भूमिका साकारली हाेती. या नाटकासाठी अक्षय पेडणेकर, गणेश जाेशी, वामन जाेग, रामदास माेरे, अनिकेत आपटे यांनी सहकार्य केले.

उर्वरीत निकाल

दिग्दर्शन : प्रथम - राजेश मयेकर (किनारा, रत्नागिरी), द्वितीय - गणपत घाणेकर (जिथे राबती हात, सिंधुदुर्ग).
नेपथ्य व रंगमंच व्यवस्था : प्रथम - प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रवींद्र तेरवणकर (किनारा), द्वितीय - दत्ताराम कुळे, हरेश खवणेकर, अविनाश सावंत (जिथे राबती हात).
उत्कृष्ट अभिनय पुरुष - मारूती मेस्त्री (सावतामाळी), स्त्री - श्रद्धा मयेकर (किनारा).
विशेष अभिनय प्रमाणपत्र - प्रशांत आडिवरेकर (किनारा, रत्नागिरी), संदीप अवघड (गटार, दापाेडी विभाग), सुविधा कदम (जिथे राबती हात, सिंधुदुर्ग), प्रीती ठाकूर (अर्धा काेयता, लातूर), गणेश कदम (खेळीया, नांदेड), नारायणराव पांचाळ (अर्धा काेयता, लातूर), रितिका सावंत व प्रसाद लाड (दाेघेही जिथे राबती हात, सिंधुदुर्ग).

Web Title: Ratnagiri Kinara stands first in inter departmental drama competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.