रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग सुरू, 'या' मार्गावरुन वळविण्यात आली वाहतूक; नाणीज हायस्कूलजवळ खचला होता रस्ता

By मनोज मुळ्ये | Published: June 30, 2023 12:54 PM2023-06-30T12:54:56+5:302023-06-30T12:56:24+5:30

मोठी वाहने मात्र जाग्यावरच अडकून पडली

Ratnagiri-Kolhapur highway opened, Traffic was diverted from the route via Lanja Dabhol | रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग सुरू, 'या' मार्गावरुन वळविण्यात आली वाहतूक; नाणीज हायस्कूलजवळ खचला होता रस्ता

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग सुरू, 'या' मार्गावरुन वळविण्यात आली वाहतूक; नाणीज हायस्कूलजवळ खचला होता रस्ता

googlenewsNext

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्ग काल रात्री नाणीज हायस्कूलजवळ खचला. त्यात एक ट्रक रुतून बसला. त्यामुळे सारी वाहने अडकून पडली. येथील रस्ता दुरुस्तीपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी वाहतूक लांजा- दाभोळमार्गे सुरू करण्यात आली आहे.

या महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. रस्ता अनेक ठिकाणी उखडून ठेवला आहे. रात्री १२:३० च्या दरम्यान हा रस्ता खचला. त्यात दोन वाहने रुतून बसली. ती बाजूला करण्यासाठी क्रेन आणली. तीही तिथे फसली. या सर्व प्रकारामुळे सर्व वाहने दुतर्फा अडकून पडली. रात्रीच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छोटी वाहने चोरवणे मार्गे सोडण्यास सुरुवात केली आहे. मोठी वाहने मात्र जाग्यावरच अडकून पडली होती. आता येथील रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार आहे. 

त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा- दाभोळ मार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गच्या अधिकारी व कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम केल्याने राज्यमहामहामार्ग १६६ यावर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून रस्ता सुरळीत सुरू झाला आहे

Web Title: Ratnagiri-Kolhapur highway opened, Traffic was diverted from the route via Lanja Dabhol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.