रत्नागिरी : गुहागर नगपंचायतीच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी ३२ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:44 PM2018-03-20T13:44:07+5:302018-03-20T13:44:07+5:30
गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी ५५, तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. अखेरच्या दिवशी नगरसेवकपदासाठी सर्वात जास्त ३२, तर नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज प्राप्त झाले.
गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी ५५, तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. अखेरच्या दिवशी नगरसेवकपदासाठी सर्वात जास्त ३२, तर नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज प्राप्त झाले.
सोमवारी नगराध्यक्षपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये भाजपकडून रवींद्र यशवंत बागकर व अपक्ष म्हणून राजेंद्र सीताराम आरेकर यांनी अर्ज भरला आहे. सोमवारी नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये नीती नितीन सुर्वे, प्राचायी दीपक मोरे (प्रभाग १), प्रभाग २मधून उमेश अनंत भोसले, राकेश कमलाकर साखरकर, प्रभाग ३ मधून अनघा सुहास कचरेकर, वर्षा दत्ताराम गिजे व दक्षता दिगंबर शेटे, प्रभाग ४ मधून श्रद्धा राहुल भोसले, प्रभाग ५ मधून समीर सुधाकर घाणेकर व शैलेश विलास भोसले,
प्रभाग ६ मधून जयदेव मुरलीधर मोरे, विलास सुरेश वाघधरे, गजानन शंकर वेल्हाळ, प्रभाग ७ मधून स्मिता रहाटे, नीलिमा सतीश गुरव, प्रभाग ८मधून अरुण गोविंद रहाटे, अंकुर विश्वनाथ रहाटे, प्रभाग ९ मधून स्नेहल शांताराम वरंडे, प्रभाग १० मधून जयदेव मुरलीधर मोरे व प्रकाश जगन्नाथ रहाटे, प्रभाग १२ मधून भाग्यलक्ष्मी महेश कानडे, रश्मी रवींद्र भावे,
प्रभाग ११मधून स्नेहा जनार्दन भागडे, प्रभाग १३मधून संगीता संजय वराडकर, प्रभाग १४ मधून संजय बाळाराम मालप, अनिकेत प्रकाश जाधव, प्रभाग १६मधून संतोष जनार्दन गोयथळे, योगेश प्रताप गोयथळे, प्रभाग १७मधून मृणाल राजेश गोयथळे आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.