रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:07 PM2018-12-20T13:07:34+5:302018-12-20T13:09:09+5:30
रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख ...
रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत़
रत्नागिरी नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शहर परिसरामध्ये रत्नागिरी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६ बाजारपेठ - धनजीनाका, रत्नागिरी नगर परिषद प्राथमिक शाळा कमांक १० मिरकरवाडा उर्दू शाळा, प्राथमिक शाळा क्रमांक १८ राजिवडा उर्दू शाळा आणि प्राथमिक शाळा क्रमांक २२ कोकणनगर उर्दू शाळा अशा चार शाळा आहेत.
रत्नगिरी नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी या सर्वच शाळांना शासनाच्या विविध योजनांचा कसा फायदा होईल, यासह शाळांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष दिले. अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या उर्दू शाळांना अनुदान मिळावे, यासाठी चारही उर्दू शाळांकडून प्रस्ताव मागविले होते.
त्यानंतर प्रशासन अधिकारी मुरकुटे यांनी सतत पाठपुरावा करून या चारही शाळांना या योजनेचे अनुदान मंजूर करुन घेण्यात यश मिळवले. त्यामुळे या चारही शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे.