रत्नागिरी : गरजू, अपंग व्यक्तिंसाठी नवऱ्याकडून एक अधिकचा फेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:48 PM2018-05-17T18:48:20+5:302018-05-17T18:48:20+5:30
रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था शाखा, राजापूरचे युवक तालुका संघटक व सध्या पुणे येथे नोकरी करत असूनही गावाशी सतत संपर्कात असलेल्या वैभव कोकरे या तरूणाने आपल्या लग्नामध्ये लग्नमंडपात दातृत्त्वाचा आदर्श पायंडा घातला.
वाटूळ : रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था शाखा, राजापूरचे युवक तालुका संघटक व सध्या पुणे येथे नोकरी करत असूनही गावाशी सतत संपर्कात असलेल्या वैभव कोकरे या तरूणाने आपल्या लग्नामध्ये लग्नमंडपात दातृत्त्वाचा आदर्श पायंडा घातला.
या शुभदिनी या नवऱ्याने बायकोसोबत सात फेरे घालताना एक अधिकचा फेरा समाजातील गरजू, अपंग व्यक्तिंसाठी आणि अविरत झटणाऱ्या दोन संस्थांसाठी घेतला.
आपल्या आहेराच्या रकमेतील काही रक्कम समाजातील पांडुरंग वरक या अपंग व्यक्तीसाठी, तर तुषार झोरे या अपंग विद्यार्थ्यासाठी आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या संस्था, रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था रोख रकमेची मदत करत नवा पायंडा घालून दिला.
यावेळी संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष व अपंग कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष विकास गोरे, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश झोरे, लांजा अध्यक्ष बाळकृष्ण झोरे व अनेक मान्यवर उपस्थित होते.