रत्नागिरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर, मतदारसंघ नुसार आरक्षण जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:49 PM2022-07-28T12:49:32+5:302022-07-28T12:50:07+5:30
सर्वांचे लक्ष लागू राहिलेल्या आरक्षण साेडतीला अखेर आज मुहूर्त मिळाला.
रत्नागिरी : सर्वांचे लक्ष लागू राहिलेल्या आरक्षण साेडतीला अखेर आज मुहूर्त मिळाला. रत्नागिरीपंचायत समितीचेआरक्षण गुरुवारी जाहीर झाले असून, वाटद पंचायत समिती गट अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे. तर केळ्ये, नाणीज, खेडशी, कर्ला म्यु. बाहेर आणि हरचिरी हे गण ओबीसीसाठी आरक्षित झाले आहेत.
रत्नागिरी पंचायत समितीची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे : जयगड - सर्वसाधारण, वाटद - अनुसूचित जाती महिला, खालगाव - सर्वसाधारण, ओरी - सर्वसाधारण, वरवडे खारवीवाडा - सर्वसाधारण महिला, कोतवडे - सर्वसाधारण महिला, केळ्ये - ओबीसी, करबुडे - सर्वसाधारण, हातखंबा - महिला सर्वसाधारण, नाणीज - ओबीसी महिला, खेडशी - ओबीसी महिला,
मिरजोळे - सर्वसाधारण, झाडगाव म्यु. हद्दीबाहेर - सर्वसाधारण, साखरतर - सर्वसाधारण, कर्ला म्यु. हद्दीबाहेर - ओबीसी, नाचणे - सर्वसाधारण, कुवारबाव - सर्वसाधारण, हरचिरी - ओबीसी महिला, गोळप - सर्वसाधारण महिला, भाट्ये - सर्वसाधारण महिला, पावस - सर्वसाधारण महिला, गावखडी - महिला सर्वसाधारण.