रत्नागिरी पोलिसांनी शोधले हरवलेले १८ मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:11+5:302021-08-20T04:35:11+5:30

रत्नागिरी : मोबाईल एकदा हरवला की परत सापडत नाही, असा अनुभव अनेकांना आला असेल. केवळ सीमकार्ड ब्लॉक करण्यासाठी आणि ...

Ratnagiri police find 18 lost mobile phones | रत्नागिरी पोलिसांनी शोधले हरवलेले १८ मोबाईल

रत्नागिरी पोलिसांनी शोधले हरवलेले १८ मोबाईल

Next

रत्नागिरी : मोबाईल एकदा हरवला की परत सापडत नाही, असा अनुभव अनेकांना आला असेल. केवळ सीमकार्ड ब्लॉक करण्यासाठी आणि त्याचा गैरवापर झाला तर आपल्या अंगाशी येऊ नये, म्हणून केवळ औपचारिकता म्हणून त्याची तक्रार दिली जाते. पण रत्नागिरी पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलबाबत सतत पाठपुरावा करुन तब्बल १८ जणांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत मिळवून दिला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनखाली रत्नागिरी सायबर सेलने १८ मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे.

त्यामध्ये चिपळुणातील ९, अलोरेतील २, सावर्डेतील १, संगमेश्वरमधील २, पूर्णगडमधील १ व रत्नागिरी शहरातील ३ मोबाईलचा समावेश आहे. या अठराजणांना नुकत्याच एका कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले.

सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर, महिला हेडकाॅन्स्टेबल निशा केळकर, पोलीस नाईक अमोल गमरे, पोलीस काॅन्स्टेबल नीलेश शेलार, अजिंक्य ढमढेरे व पूजा गायकवाड या पथकाने मोबाईल शोधण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा व पोलीस नाईक रमिज शेख यांनी मोबाईल शोधण्यासाठी तसेच त्या-त्या पोलीस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत सायबर सेलला झाली आहे.

Web Title: Ratnagiri police find 18 lost mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.