अमली पदार्थांचे रॅकेट नष्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांची कडक कारवाई, नऊजणांच्या हद्दपारीचे प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

By शोभना कांबळे | Published: August 30, 2023 04:45 PM2023-08-30T16:45:48+5:302023-08-30T16:46:20+5:30

रत्नागिरी : शहरात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातील आरोपी तसेच वाद वाढवून सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या अशा नऊ ...

Ratnagiri police take strict action to destroy drug racket, proposal to provincial authorities to deport nine persons | अमली पदार्थांचे रॅकेट नष्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांची कडक कारवाई, नऊजणांच्या हद्दपारीचे प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

अमली पदार्थांचे रॅकेट नष्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांची कडक कारवाई, नऊजणांच्या हद्दपारीचे प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

googlenewsNext

रत्नागिरी : शहरात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातील आरोपी तसेच वाद वाढवून सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या अशा नऊ जणांविरोधातील हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस प्रशासनाकडून रत्नागिरीचे प्रांताधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात महिलेचाही समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी शहरातील काही भागात अनेक ठिकाणी अमली पदार्थांचे साठे सापडले आहेत. यापैकी काहींचे अमली पदार्थ विक्रीत अनेक ठिकाणी लागेबांधे असण्याची शक्यताही पोलिस विभागाकडून वर्तविली जात आहे. याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकांना जेरबंदही करण्यात आले आहे. तर याविरोधात पोलिसांनी कारवाईची जोरदार मोहीम उघडली आहे.

यात अडकलेल्या काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गंभीर गुन्हे लक्षात घेऊन तसेच सामाजिक शांततेला बाधा येऊ नये, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव रत्नागिरीच्या उपविभागीय कार्यालयाकडे सुनावणीसाठी पाठविले आहेत. यात काही महिलांचाही समावेश आहे. 

रिहाना ऊर्फ रेहाना ऊर्फ रिजवाना गफार पकाली, ओंकार मोरे, हेमंत भास्कर पाटील, सरफराज ऊर्फ बाॅक्सर अहमद शहा, स्वप्नील बाळू पाचकुडे, सलमान नाजिम पावसकर, फहीम अहमद नूरमहंमद खडकवाले, अमिर मुजावर, अमेय राजेंद्र मसूरकर यांचा समावेश आहे. 

यापैकी काहीजण अमली पदार्थ विक्रीत अडकलेले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे समाजस्वास्थ्याला बाधा निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन अशांवर कठोर कारवाई होण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनाने त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. या नऊ जणांचे प्रस्ताव सुनावणीसाठी प्रातांधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. यावर लवकरच प्रांताधिकारी सुनावणी घेणार आहेत.
 

Web Title: Ratnagiri police take strict action to destroy drug racket, proposal to provincial authorities to deport nine persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.