रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र, भाजपविरोधी प्रचार करणार : वालम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:03 PM2018-07-03T14:03:50+5:302018-07-03T14:06:05+5:30

महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे जाऊन भाजपविरोधात प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ratnagiri: The protest against the refinery project will be intense, anti-BJP: Valm | रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र, भाजपविरोधी प्रचार करणार : वालम

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र, भाजपविरोधी प्रचार करणार : वालम

Next
ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र, भाजपविरोधी प्रचार करणार : वालममहाराष्ट्रभर संपर्क अभियान, विरोधकांना मदत करू

रत्नागिरी : महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे जाऊन भाजपविरोधात प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजापूर नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही भाजपच्या उमदेवाराविरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

रिफायनरी प्रकल्पाला भाजपचा पाठिंबा असल्याने भाजपविरोधातच आता आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगिले. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सरकारकडून त्रस्त, दु:खी असलेले शेतकरी व इतर संघटना यांच्या गाठीभेटी आमच्या कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेतर्फे, संपर्क अभियानमार्फत घेण्याचे सुरू केले आहे.

आता आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे भाजपविरोधात रान उठवणार, भाजपवाले कसे खोटे बोलून जनतेला फसवतात, ते लोकांपर्यंत तोंडी तसेच लेखी पत्रकांच्या माध्यमातून पोहोचून पटवून देण्यात येणार असल्याचे वालम यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, भाजपच्या फसव्या उमेदवाराला मतदान करू नका अन्यथा भविष्यात तुमच्या पदरी फसवणुकीशिवाय काहीच मिळणार नाही. कोकणी जनतेचा रिफायनरीला विरोध असतानाही केंद्रापासून राज्यातलेही प्रमुख भाजप नेते सौदी अरेबिया, आबुधाबी यांच्या सुलतानाला कोकण विकायचा कट रचला आहे.

नाणार रिफायनरीसाठी पहिली १६ गावातील १५ हजार एकर जमीन नंतर पुन्हा रिफायनरीला धरण नावाखाली त्याला लागूनच खाडी किनाऱ्याच्या २५ गावांतील ११ हजार एकर जमीन देण्याचे मान्य केले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांना कोकणातील किंवा महाराष्ट्रातील जनतेचे काहीही सुख-दु:खाचे पडले नसल्याचे वालम यांनी सांगितले आहे.

सभागृह बंद पाडणार

नागपूर येथे पावसाळी अधिवेशनात दिनांक ११ जुलै रोजी उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी सभागृहाचे काम बंद पाडण्यासाठी सर्व पक्षाच्या आमदारांना विनंती करण्यात आली आहे. आमदारांनी त्याला सहमती दर्शवली असल्याचेही वालम यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri: The protest against the refinery project will be intense, anti-BJP: Valm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.