रत्नागिरी : महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:29 PM2018-04-04T17:29:24+5:302018-04-04T17:29:24+5:30

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीने नंबर १ गाठला आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. २ एप्रिल रोजी रत्नागिरीत पेट्रोलचा असलेला दर हा गेल्या वर्षभरातील सर्वोच्च दर होता.

Ratnagiri: Ratnagiri No. 1 in petrol prices in important cities | रत्नागिरी : महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वन

रत्नागिरी : महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वन

Next
ठळक मुद्देमहत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वनपेट्रोलचा असलेला दर गेल्या वर्षभरातील सर्वोच्च दर

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीने नंबर १ गाठला आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. २ एप्रिल रोजी रत्नागिरीत पेट्रोलचा असलेला दर हा गेल्या वर्षभरातील सर्वोच्च दर होता.

मागील वर्षी याचदिवशी म्हणजे ३ एप्रिलला रत्नागिरीत पेट्रोलचा दर ७३.६९, तर डिझेलचा दर ६१.४३ एवढा होता. त्यानंतर वर्षभराने म्हणजे यावर्षी ३ एप्रिलला हाच दर ८२.७० आणि डिझेलचा दर ६८.८७ प्रतिलिटर एवढा आहे. त्यामुळे वर्षभरात पेट्रोलने ९.०१ रुपयांनी उसळी मारली आहे, तर डिझेल ७.४४ रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षभरात केवळ चार वेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले. उर्वरित वेळा हे दर वाढतच आहेत.

दि. २५ मार्च रोजी रत्नागिरीत पेट्रोल ८१.५६, तर डिझेल ६७.७२ रूपये प्रतिलीटर दराने विकले जात होते. मात्र, ३ एप्रिल रोजी पेट्रोल ८२.७०, तर डिझेल ६८.८७ रुपये दराने विकले जात होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसात या दरात अनुक्रमे १.१४ व १.१५ रुपयांची वाढ झाली आहे. वर्षभरात ९ रुपयांची वाढ झाली असली तरी गेल्या चार महिन्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त भडकल्याचे दिसून येते. हा भडका आता रत्नागिरीकरांच्या चांगलाच जिव्हारी लागत आहे.

रत्नागिरीनजीकच्या जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोलचे भाव अधिक भडकल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी वाढत असल्याने सामान्य रत्नागिरीकरांना वाहन परवडेनासे झाले आहे. वारंवार वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे आता जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढणार असून त्यामुळे सामान्यांना जिणे नकोसे होणार आहे.

सर्वाधिक वाढ रत्नागिरीत

रत्नागिरीपेक्षा पेट्रोलचे सर्वाधिक दर हे नांदेड, अकोला या जिल्ह्यात असले तरी पेट्रोलमध्ये गेल्या वर्षभरात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीत मोठी वाढ झाली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दरात जास्तीत जास्त ७ रुपयांची वाढ झाली आहे. रत्नागिरीत ही वाढ ९.०१ रुपयांची आहे. त्यामुळे रत्नागिरीत झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीतील फरक दिसून येतो.

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार

पेट्रोल, डिझेलच्या भडकलेल्या दरामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी येणारा भाजीपाला हा ९० टक्के कोल्हापूर, सातारा येथून येतो. सध्या भाज्यांचे दर हे स्थिर असले तरी वाढत्या पेट्रोल डिझेल दरांमुळे ते वाढण्याची शक्यता आहे. वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने हे दर वाढणार आहेत.

महत्त्वाच्या शहरांमधील मंगळवारचे दर
शहर                    पेट्रोल                 डिझेल
कोल्हापूर               ८१.८४            ६८.0८
सिंधुदुर्ग                 ८२.६६           ६८.८४
रत्नागिरी               ८२.७०          ६८.८७
सातारा                   ८१.९९          ६८.३०
मुंबई                      ८१.८०           ६८.८९
पुणे                        ८१.६७            ६७.८६

Web Title: Ratnagiri: Ratnagiri No. 1 in petrol prices in important cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.