रत्नागिरी : कोकण परिमंडलांतर्गत महावितरणकडून विक्रमी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 05:47 PM2018-11-10T17:47:56+5:302018-11-10T17:49:16+5:30
सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, कोकण परिमंडलांतर्गत एकूण १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.
रत्नागिरी : सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, कोकण परिमंडलांतर्गत एकूण १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.
कोकण परिमंडलातील ७७ हजार १०६ घरगुती ग्राहकांकडून एकूण ७ कोटी ३४ लाख ९६ हजाराची वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३४ हजार ५२७ ग्राहकांकडून ३ कोटी २९ लाख १६ हजार, तर सिंधुदुर्गच्या ४२ हजार ५७९ ग्राहकांकडून ४ कोटी ५ लाख ८ हजार रूपये वसूल करण्यात यश आले आहे.
वाणिज्य विभागातील कोकण परिमंडलांतर्गत ९ हजार १८४ ग्राहकांकडून ३ कोटी १४ लाख ५० हजार रूपये वसूल करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजार ४१२ ग्राहकांकडून एक कोटी ३५ लाख ५४ हजार रूपयांची वसुली केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ हजार ७७२ ग्राहकांनी १ कोटी ३५ लाख ५४ हजार रूपये भरले आहेत. औद्योगिकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार ४ ग्राहकांनी ४५ लाख ९ हजार, तर सिंधुदुर्गच्या ९६४ ग्राहकांनी ७२ लाख ६ हजार मिळून एकूण १ हजार ९६८ ग्राहकांनी १ कोटी १७ लाख ६९ रूपये भरले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीच्या २ हजार ६३६ ग्राहकांनी १८ लाख ८४ हजार, तर सिंधुदुर्गच्या ३०२५ ग्राहकांनी २८ लाख ५२ हजार मिळून एकूण ५ हजार ६५१ ग्राहकांनी ४७ लाख ३६ हजार रूपये भरले आहेत. आरसीआयच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ३९ हजार ९४३ ग्राहकांनी ५ कोटी ९ लाख ७९ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ हजार ३१५ ग्राहकांकडून ६ कोटी ५७ लाख ३६ हजार मिळून एकूण ८८ हजार २५८ ग्राहकांनी ११ कोटी ६७ लाख १५ हजार रूपये भरले आहेत. सार्वजनिक पथदीपांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ४७६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी १ कोटी १८ लाख १२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५१७ संस्थांनी १ कोटी २९ लाख ६७ हजार मिळून एकूण ९९३ स्थानिक स्वराज्य संस्थांनी महावितरणकडे २ कोटी ४७ लाख ७९ हजार रूपये भरले आहेत.
सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६३० ग्राहकांकडून ३५ लाख २२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७५ ग्राहकांकडून ५५ लाख ६ हजार मिळून एकूण एक हजार ३०५ ग्राहकांकडून ९० लाख ८२ हजारांची वसुली करण्यात आली आहे. सार्वजनिक व्यवस्थेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ८३९ ग्राहकांकडून ३४ लाख ३४ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६८ ग्राहकांकडून १३ लाख ८ हजार मिळून एकूण एक हजार ६०७ ग्राहकांकडून ४८ लाख १४ हजारांची वसुली करण्यात आली आहे. इतर ग्राहकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १७० ग्राहकांकडून ११ लाख ९२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८८ ग्राहकांकडून ११ लाख ९२ हजार मिळून एकूण २५८ ग्राहकांकडून १४ लाख ३८ हजार वसूल करण्यात आले.