रत्नागिरी : विकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:32 AM2018-12-21T11:32:13+5:302018-12-21T11:35:15+5:30

विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.

Ratnagiri: A refinery project suitable for developmental perspective, Panipat Sarpanch information | रत्नागिरी : विकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहिती

रत्नागिरी : विकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहितीनाणार प्रकल्पग्रस्तांचा अभ्यास दौरा

राजापूर : आपल्या परिसराच्या सर्वांगिण विकासासह रोजगाराची साधने उपलब्ध करायची असतील तर रिफायनरी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही हे पानिपत येथील रिफायनरीवरुन सिध्द झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील गावांचा कायापालट झाला आहे. हा प्रकल्प सुरु होऊन वीस वर्षांचा कालावधी लोटत आला.

या दरम्यान कुठल्याच प्रकारचे धोके किंवा नुकसान झाल्याची एकही घटना याठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबत अनाठायी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.

देशातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार परिसरातील सुमारे चौदा गावांमध्ये होत आहे. मागील दोन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेमध्ये विरोधाचे वातावरण आहे. या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेत निर्माण झालेल्या शंका - कुशंकांचे निरसन करण्यासाठी व सत्यस्थिती पुढे यावी, यासाठी रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने हरयाणा राज्यातील पानिपत येथील रिफायनरी प्रकल्पाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात नाणार परिसरातील काही शेतकरी, जमीनदार, बागायतदार आणि पत्रकार यांचा सामावेश होता.

त्यांनी यावेळी पानिपत परिसरातील काही आजी - माजी सरपंचांशी संवाद साधला. त्यामध्ये खोराखेरीचे सरपंच रणजीतसिंग कश्यप, कुथन गावचे सरपंच बलवानसिंग, सिंथानाचे सरपंच सतपालसिंग, दादलानाचे सरपंच दीपक राणा, त्याच गावचे माजी सरपंच नैनपाल राणा, बाहोली गावचे माजी सरपंच सरदार सज्जनसिंग यांचा समावेश होता. यावेळी येथील अधिकाऱ्यांशीही नाणार परिसरातील ग्रामस्थांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान नाणार परिसरात येऊन तेथील जनतेशी रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.

अनाठायी भीती

मागील अनेक वर्षे पानिपतचा हा संपूर्ण परिसर हिरवागार असाच राहिला आहे. या परिसरात पशुपक्षी मुक्तपणे वावरतात. झाडे आहेत, येथील पाणीही प्रदूषित झालेले नाही. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटी माहिती पसरवून अनाठायी भीती निर्माण केली जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri: A refinery project suitable for developmental perspective, Panipat Sarpanch information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.