रत्नागिरी विभागाच्या तोट्यात निम्याहून घट-दोन कोटी ९३ लाख ४० हजाराने तोट्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:55 PM2019-04-03T16:55:27+5:302019-04-03T16:56:22+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे.
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे. एक कोटी सहा लाखाचा अतिकालिक भत्ता कमी केला आहे. शिवाय जादा गाड्यांच्या नियोजनामुळे एक कोटीची उत्पन्नात भर पडल्याने तोटा कमी करण्यास हातभार लागला आहे.
रत्नागिरी विभागात आठशे गाड्या असून दिवसाला नऊ हजार फेºया सोडण्यात येतात. याव्दारे दर दिवशी लाखो प्रवाशांची वहातूक करण्यात येते. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जावून एसटी पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एसटी धावत असल्यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. इंधन दरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळास तिकीट वाढ/भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होेत असल्याने महामंडळाकडून दिवाळीसुट्टीत ‘हंगामी भाडेवाढ’ करण्यात आली होती. याशिवाय ‘प्रवासी वाढवा अभियान’, ‘मागेल त्याला एसटी’ यासारखे उपक्रम देखील राबविण्यात येत असतात. निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामुळे एसटीला उत्पन्न प्राप्त होत आहे. अवैध प्रवाशी वाहतूकीवर मात करण्यासाठी शटल फेºयादेखील सुरु केल्या आहेत.
प्रवासी खाजगी प्रवासी वहातूकीकडे वळण्यामागे एसटीचे बिघडलेले वेळापत्रक हे मुख्य कारण आहे. शिवाय स्वमालकीची वाहने वाढल्याने एसटीने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याशिवाय ‘थेट भारमानाअभावी’ लांब पल्याच्या गाड्या बंद केल्यामुळेही महामंडळाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लांबपल्याच्या गाड्या बंद केल्याने त्या मार्गावरील प्रवासी संख्या घटत असून खाजगी वहातूकीकडे वळत आहे.
रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये २६० कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. (२०१७-१८) मध्ये २५६ कोटी ८२ लाख ८७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. दोन वर्षात तब्बल ३ कोटी ७९ लाख १२ हजार रूपयांनी उत्पन्न घटले होते. २०१८-१९ चे उत्पन्न काढण्याचे काम सुरू आहे. परंतु फेब्रुवारीमध्ये तर उत्पन्नात कमालीचा फरक आहे.