रत्नागिरी : लोकमत रक्तदान शिबिराला प्रतिसाद, उपक्रमाला शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:11 PM2018-07-03T14:11:28+5:302018-07-03T14:13:59+5:30
लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिराला उपस्थित राहून रक्तदान केले.
रत्नागिरी : लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिराला उपस्थित राहून रक्तदान केले.
लोकमत परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी जपून दरवर्षी याच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. जिल्हा शासकीय रूग्णालय येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला.
जाणीव फाऊंडेशनचे महेश गर्दे, जायंट्स ग्रुप, नेवरेचे प्रशांत गांगण, उद्योजक नीलेश भोसले, चिनार नार्वेकर, अभिषेक खंडागळे, सुमित मेस्त्री, पूजा सावंत-देसाई यांच्यासह अनेकांनी यावेळी रक्तदान केले आणि लोकमतच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
नईम मजगावकर, रवींद्र रानडे यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी आवर्जून शिबिराला उपस्थित राहून लोकमतच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. अन्विक्षा भुते, एस. एस. मॅथ्यू, जी. व्ही. सावंत, एम. एस. वारंग, के.डी. मकवाना, पी. एस. अंभोरे यांचे सहकार्य लाभले.
अनेकांनी दिली भेट
लोकमतने आवाहन केल्याप्रमाणे अनेकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक, प्रशांत हरचेकर, सिध्दार्थ मराठे यांच्यासह अनेक नागरिकांनी भेट देऊन लोकमतचा गौरव केला.