रत्नागिरी : मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:57 PM2018-06-02T16:57:35+5:302018-06-02T16:57:35+5:30

पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे.

Ratnagiri: On the return journey, due to the ban on fishing, the stops fixed in the vessel | रत्नागिरी : मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्या

रत्नागिरी : मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्या

Next
ठळक मुद्दे मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्यानौकांची दुरूस्ती करण्याचे काम सुरू, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर गर्दी

रत्नागिरी : पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे.

पर्ससीन मासेमारीवर यापूर्वीच निर्बंध घालण्यात आले होते. परंतु पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू होती. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्यामुळे या दिवसात मासेमारीवर निर्बंध आणले जातात. शिवाय समुद्र खवळलेला असल्याने जीवितास असणारा धोका विचारात घेता मासेमारी दोन महिने बंद असते.

या दोन महिन्यांच्या कालावधीत खलाशी नेपाळला गावाकडे जातो. बहुतांश खलाशी नेपाळी असला तरी कर्नाटक, उत्तरप्रदेशातील काही मंडळींचा समावेश आहे. मासेमारी सुरू झाली की, ही मंडळी पुन्हा दाखल होतात. दोन महिन्यांच्या कालावधीत बोटींची देखभाल दुरूस्ती, इंजिन डागडुजी, जाळी दुरूस्तींची कामे हाती घेण्यात येतात.

पैसे ट्रान्सफर

दहा महिन्यांचा मालकांकडून हिशेब घेतला असला तरी ही मंडळीदेखील प्रवासात पैसे न घेता सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आधीच गावाकडील मंडळींच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करीत आहेत. गावच्या मंडळींना खाऊ, कपडे, सुके माशांच्या भेटी घेऊन निघाले.
 

Web Title: Ratnagiri: On the return journey, due to the ban on fishing, the stops fixed in the vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.