रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली वाहने परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:41 AM2019-03-12T11:41:50+5:302019-03-12T11:46:07+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.
लोकसभा निवडणुक जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीनिमित्ताने देशभरात आचारसंहिला लागू करण्यात आली आहे.
या आचारसंहितेमुळे सर्वच लोकप्रतिनिधींना कोणत्याही शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही. तसेच कोणत्याही विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजनही करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, शिक्षण व वित्त सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी आणि जिल्ह्यातील नऊही पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहने वापरतात.
लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने निवडणुक विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. ते आदेश आज पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले.
त्यानंतर त्यांनी निवडणुक विभागाकडे शासकीय वाहने जमा केली. त्यामुळे आता या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत दौरे करताना किंवा कार्यालयात येताना स्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागणार आहे.