‘भ्रष्टाचाराची हंडी’ फोडणारा वर्तक कुटुंबीयांचा बाप्पा, इको फ्रेंडली बाप्पा बनविण्याचे १४ वे वर्ष

By मेहरून नाकाडे | Published: September 2, 2022 04:03 PM2022-09-02T16:03:25+5:302022-09-02T16:03:54+5:30

संपूर्ण देखावा १२ फुटांचा

Ratnagiri sanjay vartak yancha corruptionachi handi phodnara ganesh dekhawa | ‘भ्रष्टाचाराची हंडी’ फोडणारा वर्तक कुटुंबीयांचा बाप्पा, इको फ्रेंडली बाप्पा बनविण्याचे १४ वे वर्ष

‘भ्रष्टाचाराची हंडी’ फोडणारा वर्तक कुटुंबीयांचा बाप्पा, इको फ्रेंडली बाप्पा बनविण्याचे १४ वे वर्ष

Next

रत्नागिरी : भ्रष्टाचार व घोटाळे या सर्वांमुळे सामान्य जनतेचे होणारे हाल, देशाच्या प्रगतीवर होणारा परिणाम, अर्थव्यवस्थेवरीले दुष्परिणाम, कुठेतरी थांबू दे, यासाठी उंदीर मामा बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत आहे. ‘हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपस में सब भाई भाई’व्दारे सर्वधर्मीयांना एकत्र घेऊनच भ्रष्टाचाराची हंडी फोडणारा गणपती बाप्पा कुवारबाव येथील संजय वर्तक यांच्या घरी विराजमान झाला आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती व देखावा साकारलेला आहे. इको फ्रेंडली बाप्पा बनविण्याचे वर्तक कुटुंबीयांचे १४ वे वर्ष असून पुठ्ठा, कागद, दोरा, पिठाची चिक्की, कापड, वडाच्या पारंब्या, तशाच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला आहे. हा संपूर्ण देखावा १२ फुटांचा आहे.

वाढता भ्रष्टाचार, घोटाळे व धर्मावरून चालेले राजकारण या सर्वांवर भक्ती मार्गातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न देखाव्याच्या माध्यमातून वर्तक कुटुंबाने केला आहे. भ्रष्टाचार व धर्माचे राजकारण यामधून होणारी गोरगरीब जनतेची पिळवणूक व महागाई ही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून बाप्पा सर्वधर्मीय लोकांना घेऊन भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहे.

Web Title: Ratnagiri sanjay vartak yancha corruptionachi handi phodnara ganesh dekhawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.