रत्नागिरी : शरद पवार यांचा नाणार दौरा अनिश्चित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 02:44 PM2018-05-09T14:44:01+5:302018-05-09T14:44:01+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा १० मे रोजी नाणार दौरा होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्यानुसार अद्याप पवार यांच्या दौऱ्याची निश्चिती झालेली नाही. मात्र, त्यांचा हा दौरा झाल्यास नाणार प्रकल्पाबाबतचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
रत्नागिरी / राजापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉँग्रेसचे खासदार यांच्या नाणार दौऱ्यानंतर या प्रकल्पाबाबतचे वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा १० मे रोजी नाणार दौरा होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्यानुसार अद्याप पवार यांच्या दौऱ्याची निश्चिती झालेली नाही. मात्र, त्यांचा हा दौरा झाल्यास नाणार प्रकल्पाबाबतचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
नाणार येथे १५ हजार हेक्टर क्षेत्रात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाविरोधात प्रकल्पविरोधी समितीतर्फे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाचे नेते अशोक वालम हे शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस तसेच मनसेच्या नेत्यांना भेटले. हा प्रकल्प होऊ नये, यासाठी या नेत्यांनी प्रयत्न करावेत, प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती.
स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे नाणार प्रकल्पाची चर्चा देशभरात पोहोचली आहे. आंदोलकांची भूमिका समजावून घेतल्यानंतर शिवसेनेने नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला असून, सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणाही सागवे येथील प्रकल्पविरोधकांच्या सभेत केली होती. मात्र, देसाई यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच नाही, असे जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे व उद्योगमंत्री देसाई यांच्या विधानातील हवा काढून घेतली.
अद्याप या प्रकल्पावरून सेना व भाजपमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. मात्र, नाणार रिफायनरीबाबत संघर्ष समितीचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ नये, अशी आपली भूमिका आहे, असे ते म्हणाले होते.
शरद पवार आडिवरेत येणार?
त्यानंतर पवार हे १० मे रोजी नाणारला येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ८ मेच्या सायंकाळपर्यंततरी पवार यांचा रत्नागिरी दौरा निश्चित झाला नव्हता. पवार हे रत्नागिरीत आले तरी काही कारणाने नाणारला जाणार नाहीत, तर आडिवरे येथे तावडे कुटुंंबीयांच्या वास्तू उद्घाटनासाठी येतील, अशी चर्चाही सुरू आहे.
पवार यांचा हा आडिवरे दौरा झालाच तर त्याचठिकाणी नाणार प्रकल्पविरोधक स्थानिकांशी त्यांचा प्रकल्पाबाबत संवाद होणार का, अशी चर्चा सुरू आहे.
स्थानिकांचा विरोध असेल तर त्या प्रकल्पासाठी पर्यायी जागेची चाचपणी करता येईल का, याबाबत केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी आहे, असे पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
मालगुंड - मराठवाडी येथील हॉटेल तारका रेसिडेन्सीच्या मागील बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये एकूण ३८,००४ रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य हस्तगत करून संशयित आरोपी संतोष वसंत साळवी याला अटक करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा १९४९चे कलम ६५ (ई) ९० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.