Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर

By मनोज मुळ्ये | Published: June 4, 2024 11:36 AM2024-06-04T11:36:08+5:302024-06-04T11:38:42+5:30

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: विनायक राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या विनायक लहू राऊत या उमेदवाराने साडेतीन हजारपेक्षा अधिक मते घेतली

ratnagiri sindhudurg lok sabha result 2024 vinayak raut vs narayan-rane maharashtra live result At the end of the sixth round, BJP candidate Narayan Rane is leading | Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024 अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असून, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे (narayan-rane) यांनी 7818 मतांची आघाडी घेतली आहे.

महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (vinayak raut) यांच्यामध्ये ही निवडणूक अटीतटीची होणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. पहिल्या फेरीमध्ये नारायण राणे यांनी 462 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची आघाडी वाढून 1302 इतकी झाली. मात्र तिसऱ्या फेरीमध्ये राणे यांना मात देत विनायक राऊत यांनी ती ३० मतांची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या फेरीपासून मात्र नारायण राणे यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होत आहे. पाचव्या फेरी अखेर राणे यांना 4239 तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 7818 इतके मताधिक्य मिळाले आहे.

या मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 25 फेऱ्या होणार असल्याने शेवटपर्यंत हा निकाल असाच अटीतटीचा होत जाणार आहे. विनायक राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या विनायक लहू राऊत या उमेदवाराने साडेतीन हजारपेक्षा अधिक मते घेतली असल्याने त्याचा फटका उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना काही प्रमाणात बसला आहे.

Web Title: ratnagiri sindhudurg lok sabha result 2024 vinayak raut vs narayan-rane maharashtra live result At the end of the sixth round, BJP candidate Narayan Rane is leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.