Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले

By मनोज मुळ्ये | Published: June 4, 2024 11:46 AM2024-06-04T11:46:25+5:302024-06-04T11:49:03+5:30

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: आठव्या फेरीनंतर नारायण राणे १४२४१ मतांनी आघाडीवर

ratnagiri sindhudurg lok sabha result 2024 vinayak raut vs narayan rane maharashtra live result Narayan Rane has more votes in Sindhudurg district than Ratnagiri | Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे (narayan rane) यांची रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये पीछेहाट झाली आहे. या तीनही मतदारसंघात उद्धव सेनेचे विनायक राऊत (vinayak raut) पुढे आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक आघाडी नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये मिळत असल्याने सहाव्या फेरी अखेर नारायण राणे सात हजार ८१८ मतांनी आघाडीवर आहेत. आठव्या फेरीत नारायण राणे यांनी १४२४१ तर नवव्या फेरीत १७००७ मतांनी आघाडी घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांना मताधिक्य मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधून विनायक राऊत यांना आघाडी मिळेल हे गणित आधीपासूनच अपेक्षित धरले जात होते. मात्र रत्नागिरीतील तीनही मतदार संघात विनायक राऊत यांना मिळालेल्या आघाडीपेक्षा अधिक आघाडी नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमधून मिळत आहे.

सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तीनही मतदारसंघांमधून नारायण राणे यांना प्रत्येक फेरीमध्ये मोठी आघाडी मिळत असल्याने त्यांनी सहाव्या फेरी अखेर ७८१८ मतांची एकूण आघाडी घेतली आहे.

Web Title: ratnagiri sindhudurg lok sabha result 2024 vinayak raut vs narayan rane maharashtra live result Narayan Rane has more votes in Sindhudurg district than Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.